Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार मदत; मंत्री पाटील यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामे करण्याबाबतचे आदेश प्रशासनास दिले आहेत. परंतु, पंचनामे करणे शक्य नाही. कारण दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वच ठिकाणी नुकसान झाले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2025 | 07:16 AM
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी 'गुड न्यूज'; कृषी भवनासाठी तब्बल 35.31 कोटींचा निधी मंजूर

कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी 'गुड न्यूज'; कृषी भवनासाठी तब्बल 35.31 कोटींचा निधी मंजूर

Follow Us
Follow Us:

परभणी : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी अगदी तुरळक पाऊस झाल्याचे पाहिला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याबाबत पत्रातील माहिती, अहवाल तपासून सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मानवत, सोनपेठ, पाथरी व परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध महसूल मंडळात जुलै महिन्यात दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. परिणामी, अर्धा ते एक फूट उंचीची सोयाबीन, कापूस, मूग व इतर पिके सतत पाण्यात राहिल्याने उद्ध्वस्त झाली. तसेच घरामध्ये पाणी शिरून घरांचे नुकसान झाले. अनेक जनावरे मरण पावली तर पावसामुळे जमिनी खरवडून गेलेल्या आहेत.

सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामे करण्याबाबतचे आदेश प्रशासनास दिले आहेत. परंतु, पंचनामे करणे शक्य नाही. कारण दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वच ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे.

पाथरी विधानसभा मतदारसंघासह परभणी जिल्ह्यातील ३१ मंडळातील शेतीची परिस्थिती तशीच आहे. परभणी जिल्ह्यात जुलैमध्ये १७, २२ व २७ रोजी अशा तीन दिवसांत मिळून ३१ मंड मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.

दहा दिवसांत तीनवेळा अतिवृष्टी

१७ ते २७ जुलै या १० दिवसांत जिल्ह्यातील पेडगाव, जांब, जिंतूर, वाघी धानोरा, चिकलठाणा, मोरेगाव, देऊळगाव-गात, मानवत या ८ मंडळांमध्ये दोनवेळा, पाथरी तालुक्यातील पाथरी, हादगाव, कासापुरी या ३ मंडळांत तीनवेळा अतिवृष्टी झाली.

आमदार विटेकर यांनी उपस्थित केला मुद्दा

परभणी, परभणी ग्रामीण, झरी, सिंगणापूर, पिंगळी, टाकळी कुंभकर्ण, बोरी, दूधगाव, केकरजवळा, कोल्हा, ताडबोरगाव, रामपुरी, बाभळगाव, सोनपेठ, पूर्णा, ताडकळस, चुडावा, कावलगाव या २० मंडळात एकदा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार पीक नुकसानीबद्दल २ हेक्टरच्या मर्यादेत जिरायती पिके प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपये, बागायती पिके प्रतिहेक्टरी १७ हजार रुपये प्रमाणे सरसकट आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी आज बुधवारी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना भेटून केली. त्यावेळी त्यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Farmers affected by heavy rains will soon get help says minister makarand patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 07:16 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Natural Disaster

संबंधित बातम्या

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप
1

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली
2

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
3

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.