Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा

दुपारी दीडच्या सुमारास घरातील इतर सदस्य जेवणासाठी आल्यानंतर शिल्पा आणि ऋता दिसून न आल्याने त्यांनी घराच्या आसपास शोध घेतला. यावेळी चिमुकल्या ऋताची चप्पल विहिरीत तरंगताना दिसून आल्याने गावातील युवकांच्या मदतीने विहिरीत शोध घेण्यात आला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 15, 2026 | 11:14 AM
Karmala Drowning Incident, Wangi No 1 Karmala News, Solapur Well Drowning Case

Karmala Drowning Incident, Wangi No 1 Karmala News, Solapur Well Drowning Case

Follow Us
Follow Us:
  • चिमुकल्या ऋताची चप्पल विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले.
  • विहिरीत पाणी जास्त असल्याने तीन मोटारींच्या साहाय्याने पाणी उपसण्यात आले
  • गावातील तरुणांनी विहिरीत बुडी मारून प्रथम २ वर्षांच्या ऋताचा आणि त्यानंतर आई शिल्पा यांचा मृतदेह बाहेर काढला
Karmala News:  करमाळा तालुक्यातील वांगी नं.१ येथे विहिरीत पडून माय लेकराचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वांगी नंबर एक येथील लोकविकास डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जाधव वस्ती येथे ही घटना घडली आहे. सौ. शिल्पा सागर जाधव (वय-२८ वर्षे) आणि ऋता सागर जाधव (वय-०२ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शिल्पा यांचे पती सागर जाधव यांचे मोबाईलचे दुकान असून शुक्रवारी सकाळी ते टेंभुर्णी येथे औषधे आणण्यासाठी गेले होते. यावेळी शिल्पा यांच्या सासू शेतात कामावर गेल्या होत्या तर सासरे खंडेराव जाधव हे पक्षाघाताने आजारी असल्याने घरीच पडून असतात.

‘ट्रॉमा ‘तील कामगारांचा संघर्ष सुरूच! कंत्राटदार बदलत राहिल्याने कामगारांच्या हक्कांवर गदा येत असल्याने नाराजी

दुपारी दीडच्या सुमारास घरातील इतर सदस्य जेवणासाठी आल्यानंतर शिल्पा आणि ऋता दिसून न आल्याने त्यांनी घराच्या आसपास शोध घेतला. यावेळी चिमुकल्या ऋताची चप्पल विहिरीत तरंगताना दिसून आल्याने गावातील युवकांच्या मदतीने विहिरीत शोध घेण्यात आला. विहिरीत पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने तीन विद्युत मोटारी लावून पाणी उपसण्यात आले. यानंतर काही युवकांनी विहिरीत बुडी घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ऋताचा मृतदेह आढळला. यानंतर आणखी शोध घेतला असता काही वेळाने शिल्पा यांचा मृतदेह ही मिळून आला.

या घटनेची माहिती कळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील कार्यवाहीनंतर मायलेकीचे मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतची कार्यवाही सुरू होती. चिमुकली ऋता ही खेळत असताना घराच्या जवळ असलेल्या विहिरीत पडल्याने तिला वाचवण्यासाठी शिल्पा यांनीही विहिरीत उडी घेतली. मात्र शिल्पा यांना पोहता येत नसल्याने दोघीही विहिरीत बुडाल्या.

यूजर्सची प्रतिक्षा संपली! Google Pixel 11 सीरीज भारतात लाँच; वाचा फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

 

Web Title: Tragic incident in karmala mother and 2 year old daughter drown in well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Karmala
  • maharashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

Pandharpur Corridor: पंढरपूरच्या ऐतिहासिक वास्तूंचं होणार संवर्धन, होळकर-शिंदे वाड्यांसह मंदिरांसाठी ३६ कोटींची तरतूद
1

Pandharpur Corridor: पंढरपूरच्या ऐतिहासिक वास्तूंचं होणार संवर्धन, होळकर-शिंदे वाड्यांसह मंदिरांसाठी ३६ कोटींची तरतूद

Solapur News : करमाळ्यात फुटली राजकीय हंडी! काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप समर्थकांसह भाजपमध्ये
2

Solapur News : करमाळ्यात फुटली राजकीय हंडी! काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप समर्थकांसह भाजपमध्ये

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
3

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!
4

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.