Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

सध्या पुणे शहर, उपनगर तसेच जिल्ह्यातून नारळाला मोठी मागणी आहे. हॉटेल, खानावळ, मिठाई आणि केटरिंग व्यवसायामुळे नारळाला वर्षभर मागणी असते. मात्र, सण-उत्सवांच्या काळात या मागणीत आणखी वाढ होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 15, 2026 | 03:53 PM
नारळाला मागणी; सण-उत्सवांच्या तोंडावर दर कडाडले

नारळाला मागणी; सण-उत्सवांच्या तोंडावर दर कडाडले

Follow Us
Follow Us:

पुणे : श्रावण महिन्याला सुरुवात होताच सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नारळाला मागणी वाढली आहे. ग्राहकांसह हॉटेल, खानावळ, मिठाई आणि केटरिंग व्यावसायिकांकडून विविध प्रकारच्या नारळाची खरेदी वाढल्याने मार्केट यार्डातील घाऊक बाजारात नारळाच्या दरात गेल्या दहा दिवसांत नगामागे तीन ते चार रुपयांची वाढ झाली आहे. येत्या दिवाळीपर्यंत मागणी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा यांसह विविध सण आहेत. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी असे सण सलग येत असल्याने नारळाची मागणी वाढणार आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रात देवाला वाहण्यासाठी नारळाची मागणी वाढते. तसेच मिठाई आणि विविध पदार्थ तयार करण्यासाठी ओल्या नारळासह खोबऱ्यालाही मागणी असते. मार्केटयार्डातील भुसार बाजारात दररोज सुमारे दोन ते अडीच लाख नग नारळाची आवक होत आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नारळाची आवक पुण्यात होत आहे.

सध्या पुणे शहर, उपनगर तसेच जिल्ह्यातून नारळाला मोठी मागणी आहे. हॉटेल, खानावळ, मिठाई आणि केटरिंग व्यवसायामुळे नारळाला वर्षभर मागणी असते. मात्र, सण-उत्सवांच्या काळात या मागणीत आणखी वाढ होते. त्यामुळे पुढील काही महिने नारळाच्या बाजारपेठेत तेजी राहण्याची शक्यता आहे. आवक नियमित राहिल्यास सध्याचे दर स्थिर राहतील. मात्र, आवकेत घट झाल्यास नारळाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महागाई भिडली गगनाला

स्वयंपाकघरापासून ते तुमच्या खिशापर्यंत, महागाईचा दबाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीने सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर (सीपीआय) वाढून ४.४५% वर पोहोचला आहे, जो याआधीच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये ४.३८% होता. हा आकडा अर्थतज्ज्ञांच्या ४.५०% च्या अंदाजापेक्षा थोडा कमी असला, तरी तो अजूनही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ४% च्या निश्चित लक्ष्यापेक्षा सलग वरच आहे.

दिलासादायक ! ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात; थेट 200 रुपयांनी झाला स्वस्त

Web Title: Demand for coconuts increases prices ahead of festivals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • maharashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

Katraj Dairy Milk Price Hike: ११ सप्टेंबरपासून दुधाला नवा खरेदी दर; कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ
1

Katraj Dairy Milk Price Hike: ११ सप्टेंबरपासून दुधाला नवा खरेदी दर; कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ

BARTI Pune Contract Scam News: बार्टीच्या कंत्राटात गंभीर अनियमिततेचा आरोप; एकाच कंपनीला ९ वेळा मुदतवाढ
2

BARTI Pune Contract Scam News: बार्टीच्या कंत्राटात गंभीर अनियमिततेचा आरोप; एकाच कंपनीला ९ वेळा मुदतवाढ

Legal Notice To Vidyanand Bapat: ४८ तासांत बिनशर्त माफी मागा…; विद्यानंद बापटांना कोणी पाठवली कायदेशीर नोटीस?
3

Legal Notice To Vidyanand Bapat: ४८ तासांत बिनशर्त माफी मागा…; विद्यानंद बापटांना कोणी पाठवली कायदेशीर नोटीस?

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार
4

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.