
Mumbai-Maharashtra current news
सिटी सर्वेक्षण रखडले – स्थानिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर -भाईंदर (वा.) मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील उत्तन, चौक, पाली, डोंगरी आणि तारोडी या पाच गावांचे सिटी सर्वेक्षण गेल्या नऊ वर्षांपासून रखडले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या गावांमध्ये पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाऱ्या आगरी-कोळी नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर अधिकृत मालकी हक्क प्रस्थापित करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिकांना त्यांच्या पारंपरिक जमिनीपासून वंचित करून शहराबाहेर जाण्यास भाग पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी गुरुवारी महापालिकेच्या महासभेत केला.
मीरा-भाईंदर शहरातील जुन्या गावांमधील मालमत्तांचे नगरभूमापन करण्याचा निर्णय महापालिकेने २००७ मध्ये घेतला होता. त्यासाठी तीन खासगी संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. शहरातील एकूण १९ गावांपैकी १४ गावांचे सिटी सर्वेक्षण पूर्ण झाले, मात्र उत्तन, चौक, पाली, डोंगरी आणि तारोडी या पाच गावांनी सुरुवातीला सिटी सर्वेक्षणाला विरोध केल्याने या गावांचे सर्वेक्षण रखडले.
पाच गावांनी सिटी सर्वेक्षणास दिली संमती -दरम्यान, नंतर या पाच गावांनी सिटी सर्वेक्षणास संमती दिली. त्यानंतर २०१८ मध्ये महापालिकेने प्रशासकीय ठराव करून या गावांचे नगरभूमापन करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला अनेक वर्षे उलटूनही प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरू झाले नसल्याचा मुद्दा नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी महासभेतील प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला.
जुन्या दराचा पेच, वाढीव दराला नकार– २०१८ मध्ये पाच गावांनी सर्वेक्षणास संमती दिल्यानंतर महापालिकेने संबंधित संस्थेला काम देण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र पूर्वीच्या दराने काम करण्यास संबंधित संस्थेला अधिकृतरित्या अडचणी येत असल्याने संस्थेने वाढीव दराने सर्वेक्षण करण्याची मागणी केली. मात्र ठाणे भूमी अभिलेख विभागाने दरवाढीस नकार दिल्याने या कामाचा पेच निर्माण झाला.
पाच गावांनी सुरुवातीला सिटी सर्वेक्षणाला विरोध केल्याने या गावांचे सर्वेक्षण रखडले.
मालकी हक्कासह बांधकाम परवानग्यांवरही परिणाम- सिटी सर्वेक्षणाअभावी या गावातील नागरिकांना आपल्या मालमत्तेचा अधिकृत मालकी हक्क सिद्ध करताना अडचणी येत आहेत. त्याचबरोबर बांधकाम, मालमत्ता हस्तांतरण आणि इतर मालमत्तेशी संबंधित कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. या गावांमध्ये अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहत असून त्यांचे जन्म आणि मृत्यूदेखील याच गावांमध्ये झाले आहेत. मात्र अद्याप त्यांच्या जमिनीचे अधिकृत नगरभूमापन पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचा हक्क हिरावला जात असल्याचा आरोप बगाजी यांनी केला.
त्या स्मशानभूमीत ग्रामस्थांची नेमणूक करावी. नवी मुंबई, (वा.) नेरूळ विभागातील जुईपाडा गाव येथील स्मशानभूमीत समाजकंटकांकडून होणारी एखादी दुर्घटना टाळण्यासाठी पूर्वी स्थानिक ग्रामस्थांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली गेली. ते ग्रामस्थ असावेत अशा प्रकारची आग्रही मागणी स्थानिक नगरसेविका डॉ. प्रणाली काशिनाथ पाटील यांनी जुईपाडागाव येथील महिलांच्या वतीने महापालिकेकडे केली आहे. विशेष म्हणजे माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांनी हीच मागणी तीन वर्षांपासून प्रशासनाकडे केली होती. परंतु त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील नेरूळ विभागाअंतर्गत असलेल्या जुईपाडा गावातील सेक्टर २३ परिसरात ग्रामस्थांची असलेली स्मशानभूमी सध्या मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा विषय बनला आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी भटकी व इतर असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. या स्मशानभूमीत चरसी ड्रग्ज घेतात, गांजा ओढतात, मद्यपान करतात. तसेच या ठिकाणी दररोज दिवस व रात्री चरसीचा धिंगाणा सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या मुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. गणेशोत्सवानिमित्त मुंबई आणि कोकणदरम्यान धावणाऱ्या गणपती विशेष गाडीला वीर आणि खेडदरम्यान सापे वामने आणि विन्हेरे येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सापे वामने, कर्जतजवळील? विन्हेरे तसेच परिसरातील प्रवाशांना गणेशोत्सव काळात मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवासासाठी दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवासाठी घोषित करण्यात आलेल्या ०११०३/०११०४ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड गणपती विशेष गाडीला वीर आणि खेडदरम्यान सुट्यांतील कोकणासाठी थांबा देण्यात आला नव्हता. या परिसरातील प्रवाशांना विशेष गाडीचा लाभ घेण्यासाठी वीर किंवा खेड स्थानक गाठावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन अतिरिक्त थांबे देण्याची मागणी केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने सापे वामने आणि विन्हेरे येथे थांब्यांना मंजुरी दिली आहे.
कर्मचारी नसल्याने सेवा ठप्प
भाईंदर (वा) महानगरपालिकेने आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी ही शवदाहिनी उभारली असून तिचा लोकार्पण सोहळा १५ मे रोजी महापौरांच्या हस्ते पार पडला होता. मात्र उद्घाटनानंतर आजपर्यंत ही सुविधा प्रत्यक्ष वापरात आलेली नाही. शवदाहिनी चालवण्यासाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त न केल्याने संपूर्ण व्यवस्था ठप्प पडली आहे.
भाजपच्या नगरसेविका नयना म्हात्रे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, “या संदर्भात मी वारंवार महापौरांना माहिती दिली. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही दिले. परंतु प्रशासकीय अधिकारी त्या आदेशांची अंमलबजावणी करत नाहीत. लाखो रुपये खर्च करून उभारलेली सुविधा वापरातच येत नसेल, तर हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे.”
पाळीव प्राण्यांचे मालक तसेच प्राणिमित्रांनीही या सुविधेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शहरात पाळीव प्राण्यांची संख्या वाढत असताना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सन्मानजनक व पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शवदाहिनी उभारण्यात आली होती.
होती. मात्र प्रत्यक्षात कर्मचारीअभावी ती बंद असल्याने नागरिकांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन कर्मचारी नियुक्त करावेत आणि शवदाहिनी कार्यान्वित करावी, अशी मागणी प्राणिमित्र संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गडचिरोली, नवराष्ट्र ब्युरो. जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील सर्पदंशप्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकास बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात संस्थाचालक कोणते पित-पुत्रांसह पाच जणांवर धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्याध्यापक प्रशांत तारपल्लेवार आणि अधीक्षक भास्कर भैसरे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
धानोरा तालुक्यात जपतलाई येथील खासगी अनुदानित आश्रमशाळेत रक्षाबंधनानंतर ६ विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता. त्यापैकी २ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर तिघांवर उपचार सुरू आहेत.
कर्मचारी नसल्याने सेवा ठप्प– भाईंदर (वा) महानगरपालिकेने आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी ही शवदाहिनी उभारली असून तिचा लोकार्पण सोहळा १५ मे रोजी महापौरांच्या हस्ते पार पडला होता. मात्र उद्घाटनानंतर आजपर्यंत ही सुविधा प्रत्यक्ष वापरात आलेली नाही. शवदाहिनी चालवण्यासाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त न केल्याने संपूर्ण व्यवस्था ठप्प पडली आहे.भाजपच्या नगरसेविका नयना म्हात्रे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, “या संदर्भात मी वारंवार महापौरांना माहिती दिली. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही दिले. परंतु प्रशासकीय अधिकारी त्या आदेशांची अंमलबजावणी करत नाहीत. लाखो रुपये खर्च करून उभारलेली सुविधा वापरातच येत नसेल, तर हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे.”
पाळीव प्राण्यांचे मालक तसेच प्राणिमित्रांनीही या सुविधेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शहरात पाळीव प्राण्यांची संख्या वाढत असताना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सन्मानजनक व पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शवदाहिनी उभारण्यात आली होती.होती. मात्र प्रत्यक्षात कर्मचारीअभावी ती बंद असल्याने नागरिकांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन कर्मचारी नियुक्त करावेत आणि शवदाहिनी कार्यान्वित करावी, अशी मागणी प्राणिमित्र संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.