Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onion Rate : जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट; निच्चांकी दरामुळे शेतकरी हवालदिल

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव प्रचंड घसरल्याने जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाला लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 15, 2025 | 12:30 AM
जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट; निच्चांकी दरामुळे शेतकरी हवालदिल

जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट; निच्चांकी दरामुळे शेतकरी हवालदिल

Follow Us
Close
Follow Us:

ओतूर/मनोहर हिंगणे : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव प्रचंड घसरल्याने जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाला लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने चाळीत साठवणूक केलेल्या कांद्यास अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने साठवणूक केलेला कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून, यातून वाहतूक आणि इतर खर्चही भरून काढणे शेतकऱ्यांना शक्य होत नाहीये.

ओतूर, उदापूर, डिंगोरे, पिंपळगावजोगा, ठिकेकरवाडी, माळवाडी, नेतवड, रोहोकडी, आंबेगव्हान, पाचघर, चिल्हेवाडी, अहिनवेवाडी, डुंबरवाडी व परिसरातील इतर गावांमध्ये उन्हाळी कांद्याचे उच्च प्रतीचे उत्पादन घेतले जाते. जुन्नर तालुक्यातील यावर्षी एप्रिल ते मे महिन्यात काढणी केलेल्या चांगल्या कांद्याचे दर १५ ते १७ रुपये किलो होते. तोच कांदा सहा महिने चाळीत साठवणूक करून आता शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला असता त्यास ८ ते १० रुपये प्रति किलोला दर मिळत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार ओतूरचे व्यवस्थापक सतीश मस्करे व आडतदार शकील तांबोळी यांनी बोलताना दिली. त्यामुळे पडलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. मात्र, आता बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे आणि मागणी घटल्यामुळे दर प्रचंड कोसळले आहेत. प्रति किलो ८ ते १० रुपये पर्यंतचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी तर सहा ते आठ रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर करावी किंवा निर्यात शुल्क हटवून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी ओतूर येथील प्रगतशील शेतकरी बबन शंकरराव डुंबरे व राजाराम गायकर यांनी केली आहे. अन्यथा, अनेक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल आणि त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारने यावर त्वरित उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहू शकते, असा इशाराही काही शेतकरी नेत्यांनी दिला आहे. कांद्याचे आगार समजले जाणारे जुन्नर तालुका प्रसिद्ध असून ह्या भागातील कांद्याला वाशी, पुणे, बेंगलोर, नाशिक आदी भागात विषेश मागणी असते. कांदा हे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे एक महत्त्वाचे नगदी पीक असल्याने या समस्येवर तातडीने तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत डिंगोरे येथील प्रगतशील शेतकरी जालिंदर उकिरडे व दत्तात्रय डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Farmers in junnar taluka are in trouble as they are not getting good prices for onions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Onion News
  • onion price

संबंधित बातम्या

जत पंचायत समितीतील शाखा अभियंत्याची आत्महत्या, राजकीय दबावाची शंका; कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप
1

जत पंचायत समितीतील शाखा अभियंत्याची आत्महत्या, राजकीय दबावाची शंका; कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप

Kolhapur Municipal Elections : आघाड्यांमुळे इच्छुकांची लागणार कसोटी; कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
2

Kolhapur Municipal Elections : आघाड्यांमुळे इच्छुकांची लागणार कसोटी; कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

भरदिवसा दरोडा, चोर उसाच्या शेतात लपले अन्…; पुरंदर तालुक्यातील सिनेस्टाईल थरार
3

भरदिवसा दरोडा, चोर उसाच्या शेतात लपले अन्…; पुरंदर तालुक्यातील सिनेस्टाईल थरार

नरीमन पाईंटलाच पक्षाला नवीन कार्यालय बांधून द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा
4

नरीमन पाईंटलाच पक्षाला नवीन कार्यालय बांधून द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.