Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध! पोलीस बंदोबस्त ठेवून सर्वेक्षण सुरु

कल्याण तळोजा मेट्रोची ठाणे जिल्ह्यातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. या मेट्रोच्या कमला सुरुवात झाली आहे. या मेट्रोसाठी सोनारपाडा, उंबार्ली रोड, माणगाव परिसरातील जागा रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग केली आहे. परंतु शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 28, 2024 | 02:25 PM
मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध! पोलीस बंदोबस्त ठेवून सर्वेक्षण सुरु
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण ग्रामीण : कल्याण तळोजा मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होणार अशी घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती. याच कल्याण तळोजा (Kalyan-Taloja) या मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोनारपाडा, उंबार्ली रोड, माणगाव परिसरातील जागा ही मेट्रो रेल्वेच्या कामाकरीता राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग केली आहे. त्याठिकाणी जागा सर्वेक्षणाकरीता एमएमआरडीएचे सर्व्हेअर गेले असता शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला. पण सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त सर्वेक्षण सुरु ठेवले आहे. याविषयी संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना एक निवेदन दिले आहे.

माणगाव, उंबार्ली, माणगाव परिसरात जागा राज्य सरकारने महसूल खात्यामार्फत कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या प्रकल्पाकरीता वर्ग केली आहे. प्रकल्पासाठी वर्ग करण्यात आलेली जागा ही गायरान आहे. या गायरान जागेवर अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे आहेत. ही बांधकामे हटविण्याची नोटीस या पूर्वीच तहसील कार्यालकाडून देण्यात आली आहे. गायरान जमीनीवरील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे नियमित करु नये असे आदेश उच्च न्यायालयाने २०२२ साली दिले आहेत.

या ठिकाणी शेतकरी दशरथ म्हात्रे यांनी सांगितले की, आमची शेतजमीन वडिलोपार्जित आहे. ही जागा प्रकल्पांच्या बाधित गायरान जमीनीच्या मध्ये आहे. त्याठिकाणी एमएमारडीएकडून जबरदस्तीने सर्वेक्षण केले जात आहे. आमच्या शेतजागेचा मोबदला आम्हाला द्यावा. मगच सर्वेक्षणाचे काम करावे. या बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांचे नेते राजाराम पाटील यांनी देखील या सर्वेक्षणास विरोध केला आहे. या ठिकाणी असलेल्या पाच बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सह्याचे एक निवेदन यावेळी तहसीलदारांना दिले. शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला विरोध केला असला तरी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु ठेवले आहे.

Web Title: Farmers opposition to metro railways land survey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2024 | 02:25 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan
  • Maharashtra Government
  • MP Shrikant Shinde
  • thane

संबंधित बातम्या

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
1

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.