Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; खानापूर, कडेगाव आणि पलूसमध्ये सलग तीन दिवस मोर्चे

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होणार असून, खानापूर, कडेगाव आणि पलूस तालुक्यांत सलग तीन दिवस भव्य एल्गार मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. शक्तीपीठ संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चांद्वारे महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 20, 2026 | 07:10 PM
शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; खानापूर, कडेगाव आणि पलूसमध्ये सलग तीन दिवस मोर्चे

शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; खानापूर, कडेगाव आणि पलूसमध्ये सलग तीन दिवस मोर्चे

Follow Us
Follow Us:
  • शक्तीपीठ महामार्गाविरोधात तीन तालुक्यांत सलग तीन दिवस ‘एल्गार’
  • हजारो शेतकरी रस्त्यावर उतरणार
  • विटा, कडेगाव आणि पलूस येथे मोर्चे
 

विटा : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होणार असून, खानापूर, कडेगाव आणि पलूस तालुक्यांत सलग तीन दिवस हजारो शेतकऱ्यांचे एल्गार मोर्चे काढण्यात येणार आहेत. शक्तीपीठ संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चांद्वारे महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात येणार आहे.

संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. दीपक लाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सोमवार, २२ जून रोजी विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत, मंगळवार, २३ जून रोजी कडेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकातून प्रांताधिकारी कार्यालयावर, तर बुधवार, २४ जून रोजी पलूस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चे काढण्यात येणार आहेत. तिन्ही मोर्चांची वेळ सकाळी १० वाजता ठेवण्यात आली आहे.

‘माहितीचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न’; RTI नियम 2026 रद्द करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती, घरे आणि शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भावना व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर तीनही तालुक्यांतील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. अॅड. लाड म्हणाले, “शेतकरी एकजुटीची ताकद सरकारला दाखविण्याची वेळ आली आहे. प्रसंगी रक्त सांडू, पण शेतकऱ्यांच्या एक इंच जमिनीला देखील धक्का लागू देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील.”

या आंदोलनाला परिसरातील विविध सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे या मोर्चांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सलग तीन दिवसांचे मोर्चे

२२ जून (सोमवार) – विटा क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय

२३ जून (मंगळवार) – कडेगाव छत्रपती शिवाजी चौक ते प्रांताधिकारी कार्यालय

२४ जून (बुधवार) – पलूस छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय

संघर्ष समितीची भूमिका

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी लढा
हजारो शेतकरी व महिला सहभागी होणार
विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सर्व नऊ आरोपी निर्दोष ; धाराशिवमध्ये पद्मसिंह पाटील समर्थकांचा जल्लोष

Web Title: Farmers protest against shaktipith highway three day elgar morchas in khanapur kadegaon and palus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • Farmers
  • Shaktipeeth Highway

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
1

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
3

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Dombivli Rasrang Dandiya 2026: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; यंदाचा ‘रासरंग दांडिया’ रद्द
4

Dombivli Rasrang Dandiya 2026: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; यंदाचा ‘रासरंग दांडिया’ रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.