Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDAचा राज्यभर दणका! ११.८२ लाखांचं संशयास्पद खाद्यतेल जप्त; मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत FDAने राज्यभर धडक कारवाई केली आहे. अकोल्यात मोठ्या प्रमाणात संशयास्पद खाद्यतेल जप्त करण्यात आलं, तर मुंबईतील चार हॉटेल्सवरही कठोर कारवाई करण्यात आली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2026 | 02:43 PM
भेसळखोरांनो सावधान ! सणासुदीतील 'या' पदार्थांवर असणार आता FDA ची नजर; तुकाराम मुंढेंकडून कॅलेंडरच जारी

भेसळखोरांनो सावधान ! सणासुदीतील 'या' पदार्थांवर असणार आता FDA ची नजर; तुकाराम मुंढेंकडून कॅलेंडरच जारी

Follow Us
Follow Us:
  • अकोल्यात ७ हजार किलोहून अधिक तेल जप्त
  • मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित
  • किचनमधील अस्वच्छतेवर FDAची कारवाई
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांबरोबरच अन्नपदार्थांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेल्स, दुकाने आणि खाद्य व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात धडक कारवाई केली आहे. २५ आणि २७ऑगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अकोला एमआयडीसीमधून तब्बल ७,०२६.८ किलो संशयास्पद खाद्यतेल जप्त करण्यात आले.

Jalgaon News: जळगाव हादरले!!! नर्मदा नदी पात्रात बाप- लेक बुडाले, बापाचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता

या तेलाची किंमत तब्बल ११ लाख ८२ हजार ६५० रुपये आहे. याचवेळी मुंबईतील बीकेसी, दादर, कलिना आणि चेंबूरमधील चार हॉटेल्स व खाद्य व्यवसायांचे परवाने गंभीर त्रुटींमुळे तात्काळ निलंबित करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन कठोर आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

अकोल्यात सात टन तेलावर टाच

अमरावती विभागातील अकोला एमआयडीसीमध्ये ‘रीपॅकर’चा परवाना असतानाही बेकायदेशीर ट्रेडिंग केल्याचा प्रकार तपासणीत उघड झाला. याप्रकरणी दोन पेढ्यांवर कारवाई करण्यात आली. मे. प्रभुदयाळ लक्ष्मीनारायण यांच्याकडे अद्ययावत प्रयोगशाळेची सुविधा नसल्याचे तसेच सुठे तेलाच्या विक्रीसंदर्भात नियमांचे उल्लंघन आढळले. त्यामुळे ३,४२८.४ किलो तेल, किंमत ६ लाख २१ हजार ३०० रुपये, जप्त करण्यात आले. तर मे. भारतकुमार अँड ब्रदर्सकडे तेलाच्या पुनर्वापरासह भेसळीचा संशय आढळल्याने ३,५९८.४ किलो तेल, किंमत ५ लाख ६१ हजार ३५० रुपये, सील करण्यात आले. दोन्ही कारवायांमुळे तब्बल सात टन तेलाचा साठा प्रशासनाच्या ताब्यात गेला.

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा

अजिनोमोटोचा अतिरिक्त वापर

मुंबईतही एफडीएने कठोर कारवाई करत चार हॉटेल्स व खाद्य व्यवसायांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित कैले. यामध्ये बीकेसीतील क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी, दादरमधील में, मारियन हॉटेल अँड रेस्टॉरंट, कलिनातील मे. अक्षय कटर्स आणि चेंबूरमधील में. भगवती स्टोअर्स यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान काही ठिकाणी किचनमध्ये कृत्रिम रंग आणि अजिनोमोटोचा अतिरेकी वापर, वारंवार वापरल्याने काळवंडलेले तेल, झुरळांचा प्रादुर्भाव, जिन्याखाली उघड्यावर ठेवलेला भात तसेच गंजलेली भांडी आढळून आली. काही ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी पदाथांसाठी एकच कटिंग बोर्ड वापरला जात असल्याचेही निदर्शनास आले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Fda maharashtra action suspicious cooking oil seized mumbai hotels licenses suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • FDA
  • hotel
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
1

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
2

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
3

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
4

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.