Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वेतनातील तफावत दूर करून समान कामासाठी समान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी ५ नोव्हेंबर रोजी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही उपोषणाचे अस्त्र उगारण्याचा निर्णय.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 16, 2026 | 04:13 PM
‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार
  • ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचेही उपोषणाचे अस्त्र
बारामती : ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वानुसार उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या २० महिन्यांपासून शासनाकडे प्रलंबित असलेल्या या मागणीवर निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. मागणी मान्य न झाल्यास ५ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्यातील दुय्यम न्यायालयांतील सर्व कर्मचारी एक दिवसाच्या सामूहिक रजेवर जाणार आहेत. दुसरीकडे, सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही आमरण उपोषण आणि साखळी उपोषणाचा इशारा दिल्याने या प्रश्नाची तीव्रता वाढली आहे. (Maharashtra Court)

प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित

उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रमाणे दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी मिळावी, यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित आहे. मात्र, गेल्या २० महिन्यांपासून या प्रश्नावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी केला आहे. शासनाच्या या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि असंतोष वाढत असल्याचे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले.

Tiranga March : दिल्लीमध्ये तिरंगा आंदोलनाआधी मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांच्या घरी पोलीस दाखल, कॅनॉट प्लेसमध्ये हाय अलर्ट

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी यापूर्वी १६ सप्टेंबर २०२६ रोजी काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज पूर्ण केले होते. त्यानंतरही मागणीची दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा शुक्रवारी ( दि १६ ऑक्टोबर ) काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. राज्यातील विविध न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी काळेपती लावून निषेध नोंदवला. यामध्ये बारामती जिल्हा व सत्र न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आंदोलनात सहभाग घेतला. उद्याही काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाच्या भूमिकेचा निषेध केला जाणार आहे.

४ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याची मागणी

राज्य शासनाने ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत समान काम, समान वेतनाच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, ५ नोव्हेंबर रोजी राज्यातील दुय्यम न्यायालयांतील सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला महाराष्ट्र शासनच जबाबदार असेल, असा इशारा महासंघाने दिला आहे.

शांततामय मार्गाने वारंवार आंदोलन करूनही शासनाकडून निर्णय होत नसल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता राज्य शासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Web Title: Maharashtra court employees equal work equal pay protest mass leave november 5 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Court
  • Employees
  • maharashtra

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
1

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
2

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
3

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप
4

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.