Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: यंदाही मुंबई शहर तुंबण्याची भीती! मिठी नदीची ६१ टक्केच सफाई; मोठ्या नाल्यांची ९३.५३% सफाई झाल्याचा दावा

हवामान खात्याने यंदा वेळेवर आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जर पहिल्याच मुसळधार पावसात आणि समुद्राला भरती असताना मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर मुंबईची दैना उडणार हे निश्चित आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 27, 2026 | 09:20 AM
यंदाही मुंबई शहर तुंबण्याची भीती! मिठी नदीची ६१ टक्केच सफाई; मोठ्या नाल्यांची ९३.५३% सफाई झाल्याचा दावा

यंदाही मुंबई शहर तुंबण्याची भीती! मिठी नदीची ६१ टक्केच सफाई; मोठ्या नाल्यांची ९३.५३% सफाई झाल्याचा दावा

Follow Us
Follow Us:

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील मोठ्या नाल्यांची ९३.५३% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, पालिकेने २६ मे २०२६ च्या अधिकृत प्रगती अहवालावरून मुंबईकरांची धाकधूक वाढवणारी वस्तुस्थिती समोर आली आहे. मुख्य नाल्यांची सफाई ९३ टक्क्यांहून अधिक झाल्याचे प्रशासन सांगत असले, तरी मुंबईला पुराच्या धोक्यापासून वाचवणारी मिठी नदी अजूनही गाळातच असून तिची एकूण सफाई अवघी ६१.५०% झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाईच्या पालिकेच्या दाव्यांमधील फोलपणा, उघडा पडला असून, पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईकरांचे हाल होण्याची भीती निर्माण झाली आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मोठ्या नाल्यांच्या सफाईत शहराच्या भागात चक्क १०४.१०% काम पूर्ण झाल्याचा अजब दावा करण्यात आला आहे, तर पूर्व उपनगरात हेच काम ८३.९९% आणि पश्चिम उपनगरात ९७.३१% झाले आहे.(फोटो सौजन्य – AI)

“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?

मुख्य नाल्यांची ही सरासरी ९३.५३% वर पोहोचली असली, तरी मिठी नदीच्या सफाईत कंत्राटदारांनी कमालीची सुस्ती दाखवली आहे. मिठी नदीच्या’ ईस-५२५’ भागात तर केवळ ४८.०५% काम झाले आहे, म्हणजेच अर्ध्याहून अधिक नदी अजूनही गाळाने गच्च भरलेली आहे. तसेच ‘ईस-५२७’ मध्ये ६३.२९% आणि ‘ईस-५२६’ मध्ये ७२.३५% सफाई झाली आहे. मुंबईत मान्सूनपूर्व सरी कधीही कोसळू शकतात अशा स्थितीत मिठी नदीत अजूनही जवळपास ३८% गाळ तसाच पडून असल्याने कुर्ला, सायन, चुनाभट्टी सखल भागांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

पालिकेच्या या आकडेवारीवरून विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. विरोधकांनी टीका करताना म्हटले आहे की, ‘पालिका दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी अशीच ९० ते ९५ टक्के नालेसफाई झाल्याची खोटी आकडेवारी प्रसिद्ध करते आणि जूनच्या पहिल्याच पावसात मुंबई तुंबते. शहरात १०४% नालेसफाई झाली कशी? हा केवळ कागदोपत्री आकड्यांचा खेळ असून कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी चाललेला हा मोठा भ्रष्टाचार आहे.’ मिठी नदीची सफाई ६१ टक्क्यांवर रेंगाळली आहे, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर पालिकेने अद्याप कारवाई का केली नाही? हा मुंबईकरांच्या जिवाशी चाललेला खेळ आहे, असा हल्लाबोल विरोधकांनी केला आहे.

Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?

हवामान खात्याने यंदा वेळेवर आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जर पहिल्याच मुसळधार पावसात आणि समुद्राला भरती असताना मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर मुंबईची दैना उडणार हे निश्चित आहे. मुख्य नाल्यांची ९३.५३% सफाई झाल्याचा दावा करणाऱ्या पालिकेने आता कागदी अहवाल बाजूला ठेवून मिठी नदी आणि उपनगरातील नाल्यांची उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अन्यथा यंदाही लोकल ठप्प होऊन म यातना सहन कराव्या लागतील अशी शक्यता आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Fear of mumbai city collapse this year too only 61 percent cleaning of mithi river 93 53 percentage of major drains claimed to have been cleaned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • Monsoon 2026
  • Monsoon Alert
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘आम्ही स्वेच्छेने चर्चमध्ये येतोय…’; चर्चमध्ये प्रार्थनेपूर्वी द्यावे लागणार संमतीपत्र
1

‘आम्ही स्वेच्छेने चर्चमध्ये येतोय…’; चर्चमध्ये प्रार्थनेपूर्वी द्यावे लागणार संमतीपत्र

मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे
2

मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे

Maharashtra Breaking News Today 2026:पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका
3

Maharashtra Breaking News Today 2026:पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका

Mumbai News: काँक्रिटच्या रस्त्यावर सरावाचे थर; मॅटची गरज वाढली! मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून झाले हद्दपार
4

Mumbai News: काँक्रिटच्या रस्त्यावर सरावाचे थर; मॅटची गरज वाढली! मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून झाले हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.