Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईला पावसातून मोठा दिलासा! पालिकेने 5 दिवसांत उपसले तब्बल 180 कोटी लिटर पाणी

जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसातही मुंबईला यंदा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने 547 पंपांच्या मदतीने विक्रमी प्रमाणात पाण्याचा निचरा करत शहरात दीर्घकाळ पाणी साचू दिले नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 10, 2026 | 03:04 PM
Mumbai News: मुंबईला पावसातून मोठा दिलासा! पालिकेने 5 दिवसांत उपसले तब्बल 180 कोटी लिटर पाणी

Mumbai News: मुंबईला पावसातून मोठा दिलासा! पालिकेने 5 दिवसांत उपसले तब्बल 180 कोटी लिटर पाणी

Follow Us
Follow Us:
  • मुंबई महापालिकेने 1 ते 5 जुलैदरम्यान 180.59 कोटी लिटर पाण्याचा उपसा केला.
  • 547 हाय-कॅपॅसिटी पंपांच्या मदतीने बहुतांश भागांतील पाणी तासाभरात हटवण्यात आले.
  • पालिकेच्या नियोजनामुळे मुसळधार पावसातही मुंबईतील वाहतूक आणि जनजीवन मोठ्या प्रमाणात सुरळीत राहिले.
मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे मुंबई ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने यंदा युद्धपातळीवर कामगिरी करत मुंबईकरांना दिलासा दिला आहे. १ ते ५ जुलै या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत मुंबईच्या विविध भागांतून तब्बल १८० कोटी ५९ लाख लिटर पाण्याचा उपसा करून ते समुद्रात सोडण्यात आले. पालिकेने तैनात केलेल्या ५४७ हाय-कपॅसिटी पंपांच्या चक्रावून टाकणाऱ्या पराक्रमामुळे मुसळधार पाऊस ओसरल्यानंतर कुठेही तासाभरापेक्षा अधिक काळ पाणी तुंबून राहिले नाही.

Satara News: पोलीस बंदोबस्तात मसूर ग्रामपंचायतीकडून बेकायदेशीर व्यापारी गाळे सील

मुंबई सखल भागात वसलेली असल्याने दरवर्षी पावसाचे पाणी साचण्याची समस्या मुंबईकरांना भेडसावते. यावर मात करण्यासाठी पालिकेच्या पर्जन्यजलवाहिनी विभागाने यंदा शहर आणि उपनगरात मिळून एकूण ५४७हाय-कॅपॅसिटी पाणी उपसा पंप तैनात केले होते. पावसाचा जोर आणि पाण्याचा साठा पाहून काही पंप २ तास, तर काही संवेदनशील भागांतील पंप सलग २४ तास अविरतपणे चालवण्यात आले. (फोटो सौजन्य: Pinterest) 

अवघ्या तासाभरात केला पाण्याचा निचरा

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई पाण्याखाली जाते अशी टीका पालिकेवर होते. मात्र, यंदा आधुनिक तंत्रज्ञान आणि सूक्ष्म नियोजनामुळे पालिकेने ही टीका खोडून काढली आहे. पाऊस ओसरल्यानंतर अवघ्या तासाभरात पाण्यावा उपसा करण्यात पर्जन्य जलवाहिनी विभागाला यश आले. या यशस्वी मोहिमेबद्दल बोलताना पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईकरांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून आमचे कर्मचारी २४ तास मैदानावर होते. ५४७ पंपांच्या मदतीने १८० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी उपसणे हे एक मोठे आव्हान होते, जे पालिकेने यशस्वीपणे पेलले.

एकूण ५४७ पंप तैनात

या कामगिरीसाठी पालिकेने मुंबई शहरात १४६ पंप, पूर्व उपनगरात १७८ पंप आणि सर्वाधिक पाणी साचण्याची शक्यता असलेल्या पश्चिम उपनगरात २२३ पंप असे एकूण ५४७ पंप तैनात केले होते. पालिकेच्या या तत्परतेमुळे यंदाच्या पहिल्या मोठ्या पावसाच्या स्पेलमध्ये मुंबई सुरक्षित राहिली असून, मुंबईकरांनीही पालिकेच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Slum Rehabilitation: झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा! फडणवीसांकडून नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी

कर्मचारी २४ तास होते ऑनड्युटी

या पाच दिवसापैकी २ आणि ३ जुलै रोजी मुंबईत पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला होता. याच दोन दिवसात समुद्रात मोठी भरती असतानाही, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे कर्मचारी २४ तास तैनात होते. या संकटसमयी पालिकेने सर्वाधिक पाण्याचा निचरा केला, ज्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि लोकल सेवा विस्कळीत झाली नाही.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai pumps out 180 crore litres of rainwater in 5 days bmc reports mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Akasa Air चा यू-टर्न! सुरु होताच बंद केली नोएडा-नवी मुंबई विमानसेवा, अवघ्या दोन आठवड्यांत का घेतला मोठा निर्णय?
1

Akasa Air चा यू-टर्न! सुरु होताच बंद केली नोएडा-नवी मुंबई विमानसेवा, अवघ्या दोन आठवड्यांत का घेतला मोठा निर्णय?

धाराशिववर पाणीटंचाईचे संकट! जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक, प्रशासन सतर्क
2

धाराशिववर पाणीटंचाईचे संकट! जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक, प्रशासन सतर्क

धाराशिवचा होणार कायापालट! 45.68 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी; चौपदरीकरण, स्मार्ट स्ट्रीटसह विकासकामांना हिरवा कंदील
3

धाराशिवचा होणार कायापालट! 45.68 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी; चौपदरीकरण, स्मार्ट स्ट्रीटसह विकासकामांना हिरवा कंदील

Tomato Price: महागाईचा आणखी एक झटका! स्वयंपाकघराचं गणित बिघडणार; टोमॅटोचे दर गगनाला भिडणार
4

Tomato Price: महागाईचा आणखी एक झटका! स्वयंपाकघराचं गणित बिघडणार; टोमॅटोचे दर गगनाला भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.