Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार विधानपरिषदेच्या जागावाटपावरून भाजप आणि शिंदे सेनेत मतभेद उफाळल्यामुळे एकनाथ शिंदेंनी थेट अमित शाहांची भेट घेतली असावी, असे बोलले आहे. विशेषतः काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी आणि जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
अशातच दोन दिवसांपूर्वी अचानक दिल्लीला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी रविवारी अमित शाहांची भेट घेतली. या बैठकीत त्यांच्यासोबत माजी शिक्षणमंत्री देखील उपस्थित असल्याचे समोर आले आहे. खास बाब म्हणजे, ही भेट अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली. यात शिंदे गटाचे कोणतेही आमदार, खासदार किंवा कोणतेही स्वीय सहाय्यक देखील उपस्थित नव्हते.
अमित शाहांसोबत झालेल्या या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडी, विधान परिषद निवडणुकीतील जागावापप आणि ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे. तसेच, ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्याअसल्याच्या चर्चांवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
माहितीनुसार, ही भेट चार दिवसांपूर्वीच होणार होती. पण काही कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आता अमित शाहा आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर पुढे कोणते मोठे निर्णय घेतले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
या भेटीबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे तीन-चार दिवसांपू्र्वीच दिल्लीत गेले होते. एकनाथ शिंदे चार दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. त्यांचा दौराही फक्त दोन दिवसांचा होता. पण या काळीत त्यांनी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण अमित शाहांची वेळ मिळू शकले अमित शाह यांची वेळ न मिळाल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.






