Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवासी कमी अन् मेट्रोच्या फेऱ्या जास्त; पुणे मेट्रोचा अजब कारभार

पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मागील काही महिन्यांत घट झालेली दिसून आली आहे. ही प्रवासी संख्या वाढविण्याचे प्रयत्न महामेट्रोकडून सुरू आहेत. आता प्रवासी वाढत नसतानाही मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 30, 2023 | 08:55 AM
प्रवासी कमी अन् मेट्रोच्या फेऱ्या जास्त; पुणे मेट्रोचा अजब कारभार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मागील काही महिन्यांत घट झालेली दिसून आली आहे. ही प्रवासी संख्या वाढविण्याचे प्रयत्न महामेट्रोकडून सुरू आहेत. आता प्रवासी वाढत नसतानाही मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, रुबी हॉल ते रामवाडी आणि जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या विस्तारित मार्गांवरील सेवा नवीन वर्षापासून सुरू होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. पुणे मेट्रोची मार्गिका एक – पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि मार्गिका दोन – वनाझ ते रुबी हॉल या विस्तारित मार्गांवरील सेवा १ ऑगस्टपासून सुरू झाली. त्यानंतर मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ७० हजारांवर पोहोचली. दोन महिन्यांनंतर दैनंदिन प्रवासी संख्येत घसरण होऊन ती आता ५० हजारांवर आली आहे. प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान त्यामुळे मेट्रोसमोर आहे. त्यातच आता मेट्रोने फेऱ्या वाढविण्याचे नियोजन केले आहे.

प्रवासी संख्या कमी असताना आणि विस्तारित मार्ग सुरू होण्याआधीच फेऱ्या वाढविण्याचे पाऊल मेट्रोने उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू आहे. सध्या दिवसभरात मार्गिका एकवर ८१ फेऱ्या होत असून, नवीन वर्षात १ जानेवारीपासून ११३ फेऱ्या होणार आहेत. तसेच, मार्गिका दोनवर ८० फेऱ्या होत असून, १ जानेवारीपासून १११ फेऱ्या होणार आहेत, असे महामेट्रोने म्हटले आहे.

दरम्यान, विस्तारित मार्गावरील सेवा सुरू होण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. रूबी हॉल ते रामवाडी मार्गाचे काम पूर्ण होत आले असले तरी त्याची केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

दोन्ही मार्गिकांवर धावणार आठ मेट्रो गाड्या

गर्दीच्या वेळात मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर ६ मेट्रो गाड्या धावतात. आता १ जानेवारीपासून दोन्ही मार्गिकांवर ८ मेट्रो गाड्या धावतील. तसेच कमी गर्दीच्या वेळात दोन्ही मार्गिकांवर ४ मेट्रो गाड्या धावत आहेत.

Web Title: Fewer passengers and more metro trips strange management of pune metro nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2023 | 08:55 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • metro news
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

५६ इंचाच्या छातीचा व्यक्ती अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर, पण…; हर्षवर्धन सपकाळांची टीका
1

५६ इंचाच्या छातीचा व्यक्ती अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर, पण…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Crime News: वायफळेत युवकावर कोयत्याने हल्ला; दोन जण अटकेत, गावात तणाव
2

Crime News: वायफळेत युवकावर कोयत्याने हल्ला; दोन जण अटकेत, गावात तणाव

भारत फोर्ज आणि लिब्हेर एअरोस्पेस यांच्यातर्फे पुण्यात अत्याधुनिक लँडिंग गिअर मशिनिंग सुविधा सुरू
3

भारत फोर्ज आणि लिब्हेर एअरोस्पेस यांच्यातर्फे पुण्यात अत्याधुनिक लँडिंग गिअर मशिनिंग सुविधा सुरू

सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास…
4

सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.