संग्रहित फोटो
पिंपरी : पिंपरी पोलिसांनी एफएफआय चिटफंड (FFI Chit Fund) चालकास ८७.६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकारणी अटक केली आहे. नटराज कामत (वय ६०, रा. उद्योमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. मुक्ता उनवणे (वय ४२) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
व्यंकट उनवणे (वय 46) व मॅनेजर अपर्णा काळोखे (वय अंदाजे 30 वर्ष) हे आरोपी आहेत. सर्व आरोपी मोरवाडी, पिंपरी येथील रहिवासी आहेत. आरोपींनी संगनमताने फिर्यादी यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा देऊ असे आमिष दाखविले. या आमिषवर विश्वास ठेवण्यास भाग पाडून फिर्यादी यांच्याकडे ऑगस्ट 2021 ते डिसेंबर 2021 आणि आजतगायत 71,24,931 रुपये इतकी रक्कम गुंतवण्यास भाग पडले.
त्यावर परतावा म्हणून एकूण 16,35,069 रुपये रक्कम व मूळ रक्कम असे मिळून एकूण 87,60,000 रुपये फिर्यादी यांना परत मिळणार होते. परंतु, ही रक्कम एफएफआय चिट फंडचे डायरेक्टर आरोपी यांनी फिर्यादी यांचा विश्वासघात करून फिर्यादी व इतर ठेवीदाराचे पैसे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून फिर्यादी यांची 87,60,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करून अपहार केला.






