फोटो सौजन्य- सोशल मीडिया
UPSC NDA & NA 1 Final Result 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) आणि नेव्हल अकॅडमी (NA) परीक्षा-१, २०२६ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत एकूण ६१७ उमेदवारांनी यश संपादन केले आहे. यामध्ये ५५१ पुरुष आणि ६६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. निकालासोबतच आयोगाने निवड झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीही प्रसिद्ध केली आहे. या यादीत पुरुष गटात ईशान पचौरी आणि महिला गटात श्रेया एन गौडा हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना NDA च्या १५७ व्या कोर्सअंतर्गत भूदल (सेना), नौदल (नौसेना) आणि वायुदल (वायुसेना) मध्ये प्रवेश मिळेल. तसेच, नेव्हल अकॅडमीच्या ११९ व्या इंडियन नेव्हल अकॅडमी कोर्स (INAC) मध्येही प्रवेश दिला जाईल. परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in जाऊन आपली गुणवत्ता यादी तपासू शकतात.
1. उमेदवारांनी सर्वात आधी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर (upsc.gov.in) जावे.
2. होमपेजवर ‘What’s New’ किंवा संबंधित परीक्षेच्या निकाल विभागात (Result Section) जावे.
3. ‘NDA & NA Exam 1 2026 Final Result’ च्या लिंकवर क्लिक करावे.
4. यानंतर स्क्रीनवर निवड झालेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट PDF स्वरूपात उघडेल.
5. यामध्ये आपले नाव किंवा रोल नंबर शोधावा.
6. निकाल डाउनलोड करावा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंटआउट काढून ठेवावी.
रँक १ (रोल नं. 7943704): ईशान पचौरी
रँक २ (रोल नं. 6440787): आरश कुकरैजा
रँक ३ (रोल नं. 1449019): कौस्तव बौन्थियाल
रँक ४ (रोल नं. 1450377): ईश फोगाट
रँक ५ (रोल नं. 7741064): मिथिलेश यादव
रँक १ (रोल नं. 0344615): श्रेया एन गौडा
रँक २ (रोल नं. 3440950): अविका शर्मा
रँक ३ (रोल नं. 0240856): राजश्री राय
रँक ४ (रोल नं. 1153554): पंकज कुमारी
रँक ५ (रोल नं. 1151341): वंशिका चौधरी
UPSC ने ६१७ यशस्वी उमेदवारांची यादी गुणवत्तेच्या क्रमानुसार जाहीर केली आहे. ही मेरिट लिस्ट १२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा आणि त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, सर्व ६१७ यशस्वी उमेदवारांची निवड ही तात्पुरती आहे. अंतिम प्रवेशापूर्वी त्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने जन्मतारीख आणि शैक्षणिक योग्यतेशी संबंधित प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
ज्या उमेदवारांनी अद्याप आपली आवश्यक प्रमाणपत्रे जमा केलेली नाहीत, त्यांना ही कागदपत्रे लष्कर भरती संचालनालयाच्या निर्धारित कार्यालयात पाठवावी लागतील.
Student Well Being Report: अभ्यासात अव्वल पण मनात प्रचंड ताण; विद्यार्थिनींमध्ये का वाढतेय नैराश्य?
अतिरिक्त महासंचालनालय भरती, ॲडज्युटंट जनरल शाखा, एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (थल सेना), वेस्ट ब्लॉक नंबर-३, विंग-१, आर.के. पुरम, नवी दिल्ली – ११००६६.
उमेदवारांना त्यांचे वैयक्तिक गुण जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. UPSC अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांनी उमेदवारांचे मार्क्स आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करेल. मार्क्स प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार वेबसाईटवर जाऊन आपला स्कोर तपासू शकतील.
MPSC Group C Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! MPSC गट-क परीक्षेची पदसंख्या तब्बल…
Ans: पुरुष गटात ईशान पचौरी (रोल नं. 7943704) आणि महिला गटात श्रेया एन गौडा (रोल नं. 0344615) यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
Ans: या परीक्षेच्या माध्यमातून एकूण ६१७ उमेदवारांची (५५१ पुरुष आणि ६६ महिला) लष्कर (सेना), नौदल आणि वायुदलातील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
Ans: UPSC अंतिम निकाल जाहीर झाल्याच्या १५ दिवसांनंतर उमेदवारांचे मार्क्स आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर (upsc.gov.in) अपलोड केले जातील.






