
पुणे महापालिका निवडणुकांसाठी सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युतीची चर्चा सुरु आहे. युतीबाबात पहिली बैठक घेण्यात आली आहे. त्यामुळे युतीमध्ये भाजप शिवसेनाला किती जागा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये शिवसेनेला जागा सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजपची पहिली यादी जाहिर होणार आहे. भाजपध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच दोन दिवसांपुर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील ११ माजी नगरसेवकांसह त्यांच्या नातेवाईकांचा प्रवेश झाला आहे. त्याचबरोबर आणखी काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेशाच्या रांगेत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युतीबाबात अद्याप निर्णय झालेला नाही. शिवसेनेकडून काही जागांची यादी देण्यात आली आहे. पक्षातील वरीष्ठ नेते या जागांबाबत निर्णय घेणार आहेत. ज्या जागा मागिल निवडणुकीत भाजपच्या निवडुण आल्या होत्या. त्या जागांवरील उमेदवारांची पहिली यादी येत्या २६ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भाजपकडे सध्या १०५ माजी नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे या जागांवर भाजप कोणताच फेरबदल करणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर अन्य पक्षातून आलेल्या ११ पदाधिकार्यांना सुद्धा उमेदवारी जाहिर होण्याची शक्यता आहे.
आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार
निवडणुक आयोगाने जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. आजपासूनच अर्जांची विक्री सुद्धा सुरु होणार आहे. त्यामुळे अर्ज विक्रीबरोबर अर्ज सुद्धा स्विकारण्यात येणार आहेत. त्यामुळे आजपासून खर्या अर्थाने निवडणुक रणधुमाळीला सुरुवार होणार आहे. शहरातील १५ निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज उपलब्ध होणार आहेत.