Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन; म्हणाले…

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे स्पष्ट आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 23, 2025 | 02:51 PM
पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन; म्हणाले...

पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:
  • वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा
  • पृथ्वीराज चव्हाणांचे कार्यकर्त्यांन आवाहन
  • सत्ताधाऱ्यांवरही साधला जोरदार निशाणा
कराड : वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे स्पष्ट आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. गोटे (ता. कराड) येथे गोटे ग्राम सचिवालयाचे उद्घाटन, सुनंदा नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा, वारुंजी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ॲड. उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, काँग्रेसचा विचार हा शाहू–फुले–आंबेडकरांच्या समतेच्या विचारांवर आधारित आहे. काँग्रेसने सत्तेत असताना जनहितासाठी काम करत अनेक लोकोपयोगी संस्था उभारल्या व योजना राबवल्या. मात्र आज राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, लाखो तरुण बेरोजगार आहेत, ही गंभीर परिस्थिती असून, सत्ताधाऱ्यांना त्याचे देणेघेणे नाही, अशी टीका त्यांनी केली.

जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आणि लोकोपयोगी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची आज नितांत गरज आहे. नामदेव पाटील यांच्याकडे ही जाणीव आहे, असे चव्हाण म्हणाले. अजितराव पाटील-चिखलीकर यांनी, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्याला शिस्त लागली व महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला होता, अशी आठवण करून दिली.

कार्यक्रमास सत्वशीला चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजीत चव्हाण, उत्तमराव पाटील, ॲड. अमित जाधव, अल्ताफ शिकलगार, वैशाली जाधव, अमृता पाटील, वहिदा शेख आदी उपस्थित होते. प्राचार्य अन्वर मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. विजय माने व शिवम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले.

बांधकाम कामगारांचा निधी मतांसाठी

नामदेव पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून वारुंजी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात विकासनिधी पोहोचला आहे. पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रतिमेला साजेसे काम केले. भाजपा सरकारने बांधकाम कामगार कल्याण खात्याचा निधी मतांसाठी वापरला, तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मध्यान्ह भोजन योजना बंद करून भांडी वाटप योजना सुरू करण्यात आली, त्यामुळे मूळ लाभार्थी कामगार योजनांपासून वंचित राहिले, अशी टीकाही त्यांनी केली. शेतीमालाला हमीभाव व खतांवर सबसिडी देण्याची मागणीही त्यांनी मांडली.

उपमुख्यमंत्र्यांच्या गावात ड्रग्जचा कारखाना

उपमुख्यमंत्र्यांच्या गावात ड्रग्जचा कारखाना सापडतो, त्यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत, असा सवाल उपस्थित करत चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला. राज्यावर दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले असून जनतेची कररूपाने लूट सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Prithviraj chavan has made an important appeal to congress workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • Prithviraj Chavan

संबंधित बातम्या

15 कोटी रुपये दे, नाहीतर…; जयसिंगपूरच्या व्यापाऱ्याला अपहरण करून लुटले
1

15 कोटी रुपये दे, नाहीतर…; जयसिंगपूरच्या व्यापाऱ्याला अपहरण करून लुटले

सर्वच पक्षांचे धोरण ‘वेट अँड वॉच’, आयाराम-गयाराम गॅसवरच! याद्याकडे सर्वांचं लक्ष
2

सर्वच पक्षांचे धोरण ‘वेट अँड वॉच’, आयाराम-गयाराम गॅसवरच! याद्याकडे सर्वांचं लक्ष

दोन्ही राष्ट्रवादींचे दावे-प्रतिदावे सुरुच; एकत्र येणार की स्वतंत्र लढणार?
3

दोन्ही राष्ट्रवादींचे दावे-प्रतिदावे सुरुच; एकत्र येणार की स्वतंत्र लढणार?

Election Result : काँग्रेसचे किती नगरसेवक आणि किती नगराध्यक्ष? हर्षवर्धन सपकाळांनी दिली सविस्तर माहिती
4

Election Result : काँग्रेसचे किती नगरसेवक आणि किती नगराध्यक्ष? हर्षवर्धन सपकाळांनी दिली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.