Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर हर्षवर्धन पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर  हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.  दोन दिवसांपूर्वी या सर्व चर्चांना त्यांनी  पूर्णविराम देत इंदापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 07, 2024 | 10:28 AM
अखेर हर्षवर्धन पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार
Follow Us
Follow Us:

 इंदापूर:  भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर  हर्षवर्धन पाटील आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  शरद पवार आज (7 ऑक्टोबर) इंदापूरमध्ये सभा होणार आहे. या सभेत हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असेही सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर  हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.  दोन दिवसांपूर्वी या सर्व चर्चांना त्यांनी  पूर्णविराम देत इंदापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. पण  पक्षप्रवेशाची तारीख स्वत: शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ठरवतील, असही त्यांनी सांगितले होते.

हेही वाचा: ठरलं तर…! हर्षवर्धन पाटील ‘या’ दिवशी तुतारी हाती घेणार

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी गुरूवारी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानी त्यांची भेट घेतली. जवळपास एक तास चर्चा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र आणि कन्या अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सअपच्या डिपीला तुतारी चिन्ह असलेला फोटो ठेवला. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी आपण पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करू, असं सांगितलं होतं. त्यानंतर आज ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश कऱणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात  केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आघाडी सरकारच्या काळात  त्यांनी मंत्रापदही भूषवले.  पण 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. पण महायुतीत ही जागा अजित पवार यांच्याकडे असून त्याठिकाणी   दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, ही जागा अजित पवारांच्या वाटेला जाणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Finally harshvardhan patil will join the sharad pawar group today nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 10:18 AM

Topics:  

  • BJP
  • Harshvardhan Patil
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
1

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा
2

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
3

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
4

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.