Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात  केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आघाडी सरकारच्या काळात  त्यांनी मंत्रापदही भूषवले.  पण 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला

  • By anuradha sagar
Updated On: Oct 07, 2024 | 12:12 PM
हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Follow Us
Follow Us:

इंदापूर:  भाजपला रामराम ठोकल्यानंतर अखेर आज (07 ऑक्टोबर) हर्षवर्धन पाटील यांनी  आपल्या  कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. इंदापूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी स्वत: शरद पवार,  खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांची कन्या आणि चिंरजीव अंकिता पााटील, राजवर्धन पाटील  आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश कऱण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर  हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.  दोन दिवसांपूर्वी या सर्व चर्चांना त्यांनी  पूर्णविराम देत इंदापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. पण  पक्षप्रवेशाची तारीख स्वत: शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे ठरवतील, असही त्यांनी सांगितले होते.

हेही वाचा:  काँग्रेसच्या आमदाराने घेतली शरद पवारांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये झाली महत्त्वपूर्ण चर्चा

हर्षवर्धन पाटील यांनी गुरूवारी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानी त्यांची भेट घेतली. जवळपास एक तास चर्चा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र आणि कन्या अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सअपच्या डिपीला तुतारी चिन्ह असलेला फोटो ठेवला. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानतंर हर्षवर्धन पाटील यांनी आपण पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करू, असं सांगितलं होतं. त्यानंतर आज ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश कऱणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात  केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आघाडी सरकारच्या काळात  त्यांनी मंत्रापदही भूषवले.  पण 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. पण महायुतीत ही जागा अजित पवार यांच्याकडे असून त्याठिकाणी   दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, ही जागा अजित पवारांच्या वाटेला जाणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: लेकीच्या जीवासाठी AI च्या जंजाळात माणूसपण हरवून हतबल झालेल्या बापाची

Web Title: Finally harshvardhan patils entry into sharad pawars ncp nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • BJP

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ
1

Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

रायगडमधून मोठी बातमी! भाजप आमदाराला न्यायालयाचा दणका! 3 वर्षे कारावासाची शिक्षा, अलिबाग कोर्टाच्या निकालाने राजकीय वर्तुळात चर्चा
2

रायगडमधून मोठी बातमी! भाजप आमदाराला न्यायालयाचा दणका! 3 वर्षे कारावासाची शिक्षा, अलिबाग कोर्टाच्या निकालाने राजकीय वर्तुळात चर्चा

२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा
3

२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड
4

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.