
फोटो सौजन्य: iStock
आग इतकी भीषण होती की घरातील कपडे, धान्य, भांडी, संसारोपयोगी साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे तसेच जीवनावश्यक वस्तू काही वेळातच जळून खाक झाल्या. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सर्वस्व गमावल्याने कोरडे कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ पत्नी नीलम खताळ यांना जळीतग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. नीलम खताळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली, त्यांचे सांत्वन केले आणि तातडीची मदत सुपूर्द केली.
तात्काळ मिळालेल्या मदतीमुळे सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना तात्पुरता का होईना, मोठा आधार मिळाला आहे. पुढील काळात शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच प्रवीण दिघे, रामनाथ भोजने, पोपट चौधरी, अंकुश दिघे, भागवत कानवडे, आशिष कानवडे, संपत कानवडे, शरद कानवडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरडे कुटुंबीयांचे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळताच लोकनेते बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या यंत्रणेला संबंधित कुटुंबांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार यशोधन कार्यालयाच्या वतीने किराणा साहित्य, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ व कपडे आदींचे वाटप करण्यात आले.