Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायनमध्ये वैयक्तिक वादातून गोळीबार, गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी

काही दिवसांपासून राज्यात भरदिवसा होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारात गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस स्थानकात गोळीबार केला.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2024 | 05:17 PM
सायनमध्ये वैयक्तिक वादातून गोळीबार, गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी
Follow Us
Follow Us:

काही दिवसांपासून राज्यात भरदिवसा होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारात गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस स्थानकात गोळीबार केला. ही घटना ताजी असतानाच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबूक लाईव्ह चालू असताना मॉरिस भाई याने गोळ्या झाडून हत्या केली. या घटनांमुळे राज्य कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशीच घटना आज (शनिवारी) सायनमध्ये घडली आहे.

दारू पिताना झालेल्या वादातून गोळीबार

सायनमध्ये घडलेल्या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गोळीबाराचा मुंबई पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे. सायन कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात ही घटना घडली. दोन व्यक्तींमध्ये आपापसांत झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यतीचे नाव आकाश स्वामी असे असून गोळीबार केलेल्या व्यकतीचे नाव विवेक चेत्तियार असे आहे. आकाश स्वामी हा व्यक्ती सायन कोळीवाडा परिसरातील एका चर्चच्या बाजूला एकटाच राहत होता. शनिवारी सकाळी दोन्ही आरोपी आकाशच्या घरी गेले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला.

आकाशने दरवाजा उघडल्यानंतर विवेकने त्याच्या हातामध्ये असलेल्या बंदुकीने आकाशवर दोन राऊंड फायर गोळ्या झाडल्या. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला आहे. विवेकने मारलेल्या गोळ्या आकाशाच्या पोटात लागल्या. या गोळीबारानंतर आकाशाला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विवेक आणि आकाश यांच्यामध्ये दारू पिताना वाद झाला होता. या वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. तसेच गोळीबारात जखमी झालेल्या आकाशावर २०१७ मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर विवेकवर आधीच ७ वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अँटॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

राज्य गोळीबाराने हादरले

काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. भर दिवसा पोलीस स्थानकात झालेल्या गोळीबारामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून मॉरिस भाई यांनी हत्या केली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात एकाच खळबळ उडाली होती. त्यानंतर मॉरिस भाई याने स्वतःवरच गोळ्या झाडल्या. यामध्ये मॉरिस भाईचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला होता.

Web Title: Firing over personal dispute in sion one person critically injured in firing mumbai sion firring nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • Firring
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?
1

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?

Salman Khan: टायगर नाही, तर सलमान खान होता शूटर्सच्या निशाण्यावर; ‘या’ कारणामुळे गोळीबाराचा फसला प्लॅन?
2

Salman Khan: टायगर नाही, तर सलमान खान होता शूटर्सच्या निशाण्यावर; ‘या’ कारणामुळे गोळीबाराचा फसला प्लॅन?

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…
3

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…

Jitendra Awhad: ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुलाही…’ जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; कार्यकर्त्यालाही जीवे मारण्याची धमकी
4

Jitendra Awhad: ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुलाही…’ जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; कार्यकर्त्यालाही जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.