Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “गडचिरोलीत पाच हजार लाभार्थी कुटुंबासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस आणि शासन प्राधान्य देताना पाहायला मिळत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 25, 2025 | 09:53 PM
Devendra Fadnavis: “गडचिरोलीत पाच हजार लाभार्थी कुटुंबासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून ‘उपजिविका विकास कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ४९ गावांचा समावेश असून यात अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रीय सहभाग असणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमासाठी आगामी तीन वर्षासाठी २०.३४ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून पाच हजार लाभार्थी कुटुंबांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यास शासन प्राधान्य देत आहे. शासनाच्या या धोरणाला प्रतिसाद देत अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सक्रिय सहभागातून गडचिरोलीत उपजिविका विकास कार्यक्रमांतर्गत काम सुरू झाले आहे. हवामानाशी सुसंगत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन, उपजिविकेत सुधारणा करणे, नागरिकांचे जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण साधणे हे प्रमुख उद्दिष्टे या प्रकल्पात पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य उपक्रमांतर्गत शेती आधारित उपजिविका, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतीतर उपजिविका हस्तक्षेप, सामूहिक उद्योजकता, आरोग्य आणि पोषण या बाबींवर लक्ष देण्यात येईल.

३० जून २०२५ पर्यंत या उपक्रमात २,००० कुटुंबांची नोंदणी झाली आहे. एकूण ६६ बोडींचे गाळमुक्तीकरण करून त्यांच्या जलधारण क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. बोडी आधारित शेती प्रणालीत माशांचे संगोपन, त्यावर कुक्कुटपालन आणि त्याच पाण्याचा वापर पिकांना दिला जातो. ही पद्धत शेती उत्पादकतेत वाढ करुन ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध करून देते.

२०२७-२८ पर्यंत या प्रकल्पांद्वारे सहभागी कुटुंबांना लाभ होईल. त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न दुगुणी होईल. तसेच शेती उत्पादकता वाढवून उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील. शेतकरी गटांच्या माध्यमांतून सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण होईल, तसेच पोषण आणि आरोग्य विषयक जनजागृतीमुळे जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यासही सुरुवात होईल.

Devendra Fadnavis: “येत्या काळात महाराष्ट्र हे देशाच्या…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांच्यात सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ‘क्रिएटर्स इकॉनॉमी’च्या विकासासाठी कुशल मनुष् बळ विकासाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ही केवळ सहकार्याची सुरुवात असून येत्या काळात महाराष्ट्र हे देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (MFSCDC), मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला.

Web Title: Five thousand beneficiary families livelihood development program devendra fadnavis gadchiroli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Gadchiroli
  • Gadchiroli News

संबंधित बातम्या

दोस्त दोस्त ना रहा! फडणवीसांनी शिंदेंभोवतीचा फास आवळला? ‘या’ नेत्याच्या घरावर 100 पोलिसांनी टाकली धाड 
1

दोस्त दोस्त ना रहा! फडणवीसांनी शिंदेंभोवतीचा फास आवळला? ‘या’ नेत्याच्या घरावर 100 पोलिसांनी टाकली धाड 

BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई
2

BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई

महायुतीत तणावाचे वातावरण; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला खटकली ‘ती’ गोष्ट
3

महायुतीत तणावाचे वातावरण; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला खटकली ‘ती’ गोष्ट

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या ‘सर्वांसाठी आरोग्य संकल्पने’स उत्स्फूर्त प्रतिसाद; राज्यात ५० लाखांहून…
4

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या ‘सर्वांसाठी आरोग्य संकल्पने’स उत्स्फूर्त प्रतिसाद; राज्यात ५० लाखांहून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.