Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTI नियमांवरील वादानंतर सरकारचा यू-टर्न; अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश, बदलांना स्थगिती

माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने माघार घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर राज्य माहिती आयोगाने नव्या नियमांना स्थगिती देत पुढील निर्णय अण्णा हजारे यांच्याशी चर्चेनंतरच घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jul 02, 2026 | 06:28 PM
RTI नियमांवरील वादानंतर सरकारचा यू-टर्न; अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश, बदलांना स्थगिती

RTI नियमांवरील वादानंतर सरकारचा यू-टर्न; अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश, बदलांना स्थगिती

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील माहिती अधिकार (RTI) कायद्यात करण्यात आलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर महाराष्ट्र सरकारने तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत राज्य माहिती आयोगाला पत्र पाठवले. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्तांनी १२ जून रोजी जारी करण्यात आलेल्या सुधारित नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अण्णा हजारे यांच्या भूमिकेला महत्त्वाचे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य माहिती आयोगाला पाठवलेल्या पत्रात, “ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याशिवाय माहिती अधिकार कायद्यात कोणताही बदल किंवा अंतिम निर्णय घेणे योग्य ठरणार नाही,” असे नमूद केले होते.

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांच्या या पत्राची दखल घेत राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी सुधारित नियमांना तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे पुढील निर्णय अण्णा हजारे यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच घेतला जाणार आहे.

अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा दिला होता इशारा

राज्य सरकारने १२ जून रोजी माहिती अधिकार कायदा, २००५ संदर्भात सुधारित अधिसूचना जारी केली होती. मात्र, या नियमांना माहिती अधिकार कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला होता.

अण्णा हजारे यांनीही हे बदल तातडीने मागे न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. “माहिती अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. तो महसूल मिळवण्याचे साधन बनता कामा नये. काहीजण कायद्याचा गैरवापर करतात म्हणून शुल्क वाढवणे समजू शकते, पण त्यामागे महसूल वाढवण्याचा उद्देश नसावा,” अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

वादग्रस्त ठरलेले प्रमुख बदल

राज्य सरकारने जारी केलेल्या सुधारित नियमांमध्ये पुढील महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले होते.

  • अर्ज शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले.
  • माहितीच्या प्रतींसाठीचे शुल्क प्रति पान २ रुपयांवरून वरून ५ रुपये करण्यात आले.
  • एका अर्जात फक्त एकाच विषयाची माहिती मागवण्याची अट घालण्यात आली.
  • RTI अर्ज १५० शब्दांच्या मर्यादेत ठेवण्याची तरतूद करण्यात आली.
  • अर्जासोबत फोटो ओळखपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले.
  • प्रथम अपीलसाठी ५० रुपये आणि द्वितीय अपीलसाठी १०० रुपये शुल्क प्रस्तावित करण्यात आले.
  • माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असल्यास ती तेथूनच घेण्यास सांगण्याची तरतूद करण्यात आली.
  • पुनरावृत्तीचे RTI अर्ज निकाली काढण्याची तरतूद करण्यात आली.
  • वैयक्तिक माहिती मागवताना मोठे सार्वजनिक हित सिद्ध करणे आवश्यक करण्यात आले.
  • ई-मेल, ऑनलाईन आणि UPI द्वारे शुल्क भरण्याची सुविधा वैध करण्यात आली.
  • सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्यास अपील फेटाळण्याची तरतूद करण्यात आली.
Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

कार्यकर्त्यांकडून समाधान

नियमांना स्थगिती मिळाल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आता राज्य सरकार, माहिती आयोग आणि अण्णा हजारे यांच्यातील चर्चेनंतर सुधारित नियमांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. RTI क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, नागरिकांचा माहितीचा अधिकार अबाधित ठेवत गैरवापर रोखण्यासाठी संतुलित नियमांची आवश्यकता आहे.

Web Title: Maharashtra rti rule changes stayed after anna hazare protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Anna Hajare
  • CM Devendra Fadnavis
  • RTI activists

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
4

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.