Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis News: आमच्या मित्रपक्ष शिंदे गटाकडून हे ऑपरेशन झाले आहे. राजकारणात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्याचे सर्व तपशील जाहीर करायचे नसतात. शिंदे गटाला आमचा योग्य तो पाठिंबा होता.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 02, 2026 | 03:59 PM
Devendra Fadnavis Revelation, Operation Tiger Maharashtra, Eknath Shinde

Devendra Fadnavis Revelation, Operation Tiger Maharashtra, Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटाचे खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश
  • ठाकरेंच्या 6 खासदारांपैकी एक-दोन जणांनी भाजपमध्ये त्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी
  • या खासदांचा मूळ पक्ष शिवसेना हा आहे
CM Devendra Fadnavis revelation: शिवसेना ठाकरे गटाचे खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. या बंडखोरीच्या दरम्यान अनेक घडामोडीही घडल्या. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मुंबईतील वाय बी सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या खासदारांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. पण महत्त्वाची बाब म्हणजे, खासदारांच्या बंडखोरीच्या काही दिवस आधीपासून हे खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या घडामोडींसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे.

एका डिजीटल वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू होत्या. उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी हा दाला फेटाळून लावला आहे.

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरेंच्या 6 खासदारांपैकी एक-दोन जणांनी भाजपमध्ये त्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी केली होती. पण भाजपने त्यांच्यासाठी दारे बंद केली होती. या खासदांचा मूळ पक्ष शिवसेना हा आहे. ते शिवसेनेमधून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावाय तसेच त्यांना आमच्या पक्षात घेण्यासाठी आमच्याकडे सध्या काही तशी कोणतीही व्यवस्था नाही.” असं आमची भूमिका होती.

“आमच्या मित्रपक्ष शिंदे गटाकडून हे ऑपरेशन झाले आहे. राजकारणात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्याचे सर्व तपशील जाहीर करायचे नसतात. शिंदे गटाला आमचा योग्य तो पाठिंबा होता. त्यांना हवी असणारी आवश्यक ती सर्व मदत आम्ही नक्कीच केली. पण यापलीकडे जास्त काही सांगणे सूज्ञ राजकारणाचे लक्षण नाही. ” अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

फडणवीस म्हणाले की, ” राजकारणात प्रत्येक जण आपले भविष्य पाहत असतो. ज्या नेतृत्त्वासोबत आपण काम करत करतो,तिथे सुरक्षित भविष्य नाही, असे वाटल्यावर जिथे भविष्य सुरक्षित दिसते तिथे लोक जातात. आम्ही अडीच वर्षे विरोधात असतानाही आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटला नाही. कारण आम्ही सरकारला एकही दिवस शांत झोपू दिले नाही. आमच्या नेत्यांवर आमचा असाच विश्वास असायचा. जेव्हा नेता असा आत्मविश्वास वाढवू शकत नाही, तेव्हा पक्ष संपतात,” असा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. –

 

Web Title: Cm devendra fadnavis revelation thackeray mps shinde sena entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • BJP Politics
  • CM Devendra Fadnavis
  • Eknath shinde Shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
1

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ
2

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
3

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
4

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.