Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाच वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; मध्यरात्री सगळे झोपेत असताना बिबट्या आला अन्…

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास, पिंपळसुटी येथील मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या गोठ्यात कुटुंबीय झोपलेले असताना अचानक आवाज आल्याने बाबासाहेब वारे जागे झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2026 | 03:02 PM
शिरूर तालुक्यात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; मध्यरात्री कुटुंबिय झोपेत असताना बिबट्या आला अन्...

शिरूर तालुक्यात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; मध्यरात्री कुटुंबिय झोपेत असताना बिबट्या आला अन्...

Follow Us
Follow Us:

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (वय ५ वर्षे) मूळ करोडी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथील असून, सध्या पिंपळसुटी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वास्तव्यास होती. तिचे काका बाबासाहेब कोंडीबा वारे (वय ३६) यांनी याबाबत खबर दिली आहे. २२ जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास, पिंपळसुटी येथील मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या गोठ्यात कुटुंबीय झोपलेले असताना अचानक आवाज आल्याने बाबासाहेब वारे जागे झाले. त्यावेळी त्यांनी बिबट्याने चिमुकली भाग्यश्रीला उचलून नेत असल्याचे पाहिले.

कुटुंबीयांनी मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, बिबट्या तिला जवळील ऊसाच्या शेतात घेऊन गेला. या घटनेची माहिती तात्काळ शेतमालक, वन विभाग आणि ग्रामस्थांना देण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर भाग्यश्री गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, न्हावरे येथे नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेमुळे पिंपळसुटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

लांजा तालुक्यातही बिबट्याचा हल्ला

दुसऱ्या एका घटनेत, रात्रीच्यावेळी घरात टीव्ही पाहत बसलेल्या माणसांवर घरात घूसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. रात्री नऊच्या दरम्यान लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक कुसुमलेवाडी येथे घडली आहे. घरातील माणसांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारील जंगलात पसार झाला. बिबट्याने केलेले हल्ल्यातील जखमी संतोष गोविंद सुर्वे (वय ५०) व हर्षद राजेंद्र सुर्वे (वय १९, दोघेही राहणार बेनी बुद्रुक कुसुमलेवाडी) यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करण्यात आले. मात्र, संतोष सुर्वे यांच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पीएमपीएमलच्या कारभारावरून रविंद्र साळेगावकर आक्रमक; महापालिकेच्या सभेत केल्या या महत्त्वाच्या मागण्या

Web Title: Five year old girl dies in leopard attack at pimpalsuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Shirur Taluka

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.