Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: १०८ पाठोपाठ १०२ ही डळमळीत ! २४ तासांसाठी एकच कंत्राटी चालक; प्रसूतीसाठीही रुग्णांची गैरसोय

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात १०८ रुग्णवाहिका सेवेनंतर आता १०२ रुग्णवाहिका सेवाही चालकांच्या कमतरतेमुळे अडचणीत आली आहे. तालुक्यातील सात ठिकाणी १०२ रुग्णवाहिका उपलब्ध असल्या तरी बहुतांश ठिकाणी कंत्राटी चालक आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 03, 2026 | 02:51 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. अमळनेर तालुक्यात १०२ रुग्णवाहिका सेवा विस्कळीत.
  2. चालकांच्या कमतरतेमुळे प्रसूतीसाठी महिलांना खासगी वाहनांचा आधार.
  3. प्रत्येक रुग्णवाहिकेसाठी दोन कायमस्वरूपी चालकांची मागणी.

अमळनेर (वा.) तालुक्यात १०८ रुग्णवाहिका सेवेपाठोपाठ आता १०२ रुग्णवाहिका सेवाही अडचणीत सापडली आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेसाठी २४ तासांत एकच चालक उपलब्ध असल्याने तसेच बहुतांश चालक कंत्राटी असल्याने रुग्णांना वेळेवर सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी प्रसूतीसाठी महिलांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. Jalgaon News:

अमळनेर ग्रामीण रुग्णालय, अमळगाव ग्रामीण रुग्णालय, जानवे, मांडळ, मारवड, पातोंडा आणि ढेक प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सात ठिकाणी १०२ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र, जानवे केंद्र वगळता अन्य सहा ठिकाणचे चालक कंत्राटी आहेत. जानवे येथील कायमस्वरूपी चालकाचेही निधन झाले आहे.

Jalgaon SBI Robbery: सोन्याच्या दरोड्याचा थरारक शेवट; पोलिसांची झटपट कारवाई, चौघे गजाआड

माता व बालकांना तातडीने ही सेवा मिळावी

प्रसूतीदरम्यान माता आणि बालकांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने १०२ रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या होत्या. अलीकडे ही सेवा इतर रुग्णांसाठीही उपलब्ध करण्याची घोषणा झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, चालक रजेवर असणे किंवा वेळेवर उपलब्ध न होणे यामुळे रुग्णवाहिका सेवा विस्कळीत होत आहे. ग्रामीण भागात गरज भासल्यास शहरातून किंवा दुसऱ्या आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका मागवावी लागते. काही वेळा प्रसूतीसाठी महिलांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. रिक्षातच प्रसूती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

दोन चालकांची मागणी

प्रत्येक १०२ रुग्णवाहिकेवर कंत्राटीऐवजी कायमस्वरूपी चालक नेमावेत. तसेच २४ तास सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी दोन चालक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.

Jalgaon News: भोकरमध्ये बँक लुटण्याचा प्रयत्न; दरोडेखोर पळण्याआधीच पोलिसांच्या ताब्यात

कॉल सेंटर जिल्हास्तरावर हवे

  • १०८ रुग्णवाहिकेचे कॉल सेंटर पुणे येथे असल्याने जवळच्या केंद्रातील वाहन पाठविण्याऐवजी दूरच्या ठिकाणाहून वाहन पाठविले जाण्याच्या अडचणी उद्भवतात.
  • त्यामुळे १०८ आणि १०२ या दोन्ही सेवांचे कॉल सेंटर जिल्हास्तरावर स्वतंत्र सुरू करावेत.
  • त्यामुळे जवळच्या केंद्रातून तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: अमळनेर तालुक्यात कोणती रुग्णवाहिका सेवा अडचणीत आली आहे?

    Ans: १०८ सेवेनंतर आता १०२ रुग्णवाहिका सेवाही अडचणीत आली आहे.

  • Que: अमळनेर तालुक्यात किती ठिकाणी १०२ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत?

    Ans: अमळनेर ग्रामीण रुग्णालय, अमळगाव ग्रामीण रुग्णालय आणि पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सात ठिकाणी १०२ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.

  • Que: १०२ रुग्णवाहिका सेवा विस्कळीत होण्याचे कारण काय?

    Ans: चालकांची कमतरता, कंत्राटी नियुक्त्या आणि प्रत्येक रुग्णवाहिकेसाठी एकच चालक उपलब्ध असणे ही प्रमुख कारणे आहेत.

Web Title: Jalgaon news amalner 102 ambulance service driver shortage rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Jalgaon News
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Jalgaon SBI Robbery: सोन्याच्या दरोड्याचा थरारक शेवट; पोलिसांची झटपट कारवाई, चौघे गजाआड
1

Jalgaon SBI Robbery: सोन्याच्या दरोड्याचा थरारक शेवट; पोलिसांची झटपट कारवाई, चौघे गजाआड

Jalgaon News: भोकरमध्ये बँक लुटण्याचा प्रयत्न; दरोडेखोर पळण्याआधीच पोलिसांच्या ताब्यात
2

Jalgaon News: भोकरमध्ये बँक लुटण्याचा प्रयत्न; दरोडेखोर पळण्याआधीच पोलिसांच्या ताब्यात

BMC School Diwali Holidays: BMC शाळांना यंदा दिवाळीची बंपर सुट्टी, 16 दिवस शाळा बंद राहणार, मुंबई महापालिकेचं परिपत्रक जाहीर
3

BMC School Diwali Holidays: BMC शाळांना यंदा दिवाळीची बंपर सुट्टी, 16 दिवस शाळा बंद राहणार, मुंबई महापालिकेचं परिपत्रक जाहीर

Jalgaon News: कचरा व्यवस्थापनासाठी पालकमंत्र्यांचा ‘ॲक्शन प्लॅन’; मेहरूणमध्ये ट्रान्सफर स्टेशन सुरू
4

Jalgaon News: कचरा व्यवस्थापनासाठी पालकमंत्र्यांचा ‘ॲक्शन प्लॅन’; मेहरूणमध्ये ट्रान्सफर स्टेशन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.