Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरेंवर नवीन चेहरे शोधण्याची वेळ; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात भाजपने पुन्हा एकदा हादरा दिला आहे. उरल्यासुरल्या दोन माजी नगरसेवकांनीही ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करीत कमळ हाती घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 24, 2025 | 03:24 PM
ठाकरेंवर नवीन चेहरे शोधण्याची वेळ; पुण्यातील 'या' बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाकरेंवर नवीन चेहरे शोधण्याची वेळ; पुण्यातील 'या' बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:
  • ठाकरेंवर नवीन चेहरे शोधण्याची वेळ
  • पुण्यातील बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
  • पुण्यात आता अस्तित्वाची लढाई
पुणे : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पुढील महिन्यात 15 तारखेला या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका घेण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेने तयारीला सुरुवात केली आहे. सर्व राजकीय पक्षाचे नेतेही जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात भाजपने पुन्हा एकदा हादरा दिला आहे. उरल्यासुरल्या दोन माजी नगरसेवकांनीही ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करीत कमळ हाती घेतले आहे. यामुळे ठाकरेंकडून महापालिका निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे.

माजी मंत्री आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेले शशिकांत सुतार यांचे पुत्र आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्यासह संजय भोसले यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेत निवडुन आलेला एकही नगरसेवक आता पुण्यात त्यांच्यासोबत राहीलेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाना भानगिरे गेले. त्यानंतर अविनाश साळवे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. काही महीन्यांपुर्वी बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, संगिता ठोसर, पल्लवी जावळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत सुतार आणि भोसले हे दोनच नगरसेवक शिल्लक राहीले होते. त्यांनीही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले. हा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा मानला जात आहे. नुकतेच माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मागील वेळी निवडून आलेला एकही नगरसेवक शिल्लक राहीला नाही.

पक्षाने काय दिले नाही? स्थायी समितीत संधी दिली, गटनेते पद त्यांना दिले. त्यांना स्वत:ने केलेल्या कामावर विश्वास राहीला नाही. महाविकास आघाडीत जिंकलेल्या जागा मिळणारच होत्या, आमच्याकडे नवीन उमेदवार तयार आहेत. – संजय मोरे, शहरप्रमुख

पुण्यात आता अस्तित्वाची लढाई

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, ठाकरेंच्या शिवसेनेला आता या महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. या नवीन चेहऱ्यांमध्ये कोणाला संधी मिळणार? कोण निवडून येणार याची उत्तरे पुढील काळातच मिळतील. एकेकाळी वीसहून अधिक नगरसेवक असणाऱ्या शिवसेनेला आता पुण्यात पुन्हा पाय रोवण्यासाठी संघटनात्मक आव्हान पेलावे लागणार आहे. तसेच पक्षाच्या नेतृत्वाला पुण्याला दुर्लक्षित करून चालणार नाही.

भाजप-शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या विचारावर झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्यावर देशाला एकत्र आणले आहे, तसेच विकासाचा मोठा अजेंडा राबवला आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश करताना अभिमान वाटत आहे. – पृथ्वीराज सुतार

Web Title: Former corporators from uddhav thackerays party have joined bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Shivsena : शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा,प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार
1

Shivsena : शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा,प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा
2

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी; नाका कामगारांना मोठी मागणी
3

निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी; नाका कामगारांना मोठी मागणी

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला
4

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.