Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी; नाका कामगारांना मोठी मागणी

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे नाका कामगारांची चांदी झाली आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी मिळत असून, १५ जानेवारीपर्यंत कामगारांना सुगीचे दिवस आले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 24, 2025 | 06:13 PM
निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! (Photo Credit - X)

निवडणुकीमुळे मजुरांच्या खिशात खुळखुळणार पैसे! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • निवडणुकीचा ‘बंपर’ रोजगार!
  • रॅलीसाठी १५०० रुपयांपर्यंत रोजंदारी
  • नाका कामगारांना आले ‘अच्छे दिन’
महापालिका निवडणुकीच्या प्रचारामुळे १५ जानेवारीपर्यंत शहरातील नाका कामगारांना सुगीचे दिवस येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर १५ जानेवारीला मतदान होणार असल्याने हा कालावधीत प्रचाराच्या कामात या कष्टकरी मजूर वर्गाचा राजकीय पक्षांना विविध स्तरावर चांगलाच उपयोग होणार आहे. त्यामुळे सध्या या कामगारांचा भाव वधारणार आहे.

कामगारांत आनंदाचे वातावरण

नवी मुंबईत दहा ते पंधरा ठिकाणी कामगार नाके आहेत. त्याशिवाय लहान-मोठ्या चौकात दरररोज सकाळी रोजंदारीच्या शोधात कामगारांचा मेळा भरतो. अंदाजे नवी मुंबईत आठ ते दहा हजार नाका कामगार आहेत. यात परप्रांतीयांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येते. यातील प्रत्येकाला दरदिवशी रोजगार मिळतोच असे नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे यातील प्रत्येकाला आता रोजगाराची हमी मिळाली असून निवडणुका होईपर्यंत तरी रोजगाराचा प्रश्न मिटल्याने कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.

कंत्राटदार बजावणार मध्यस्थीची भूमिका

प्रचार कामात सहभागी होणाऱ्या पुरुष कामगाराला दिवसाला किमान ५०० आणि बाईकसह रॅलीसाठी १५०० तर महिलांना ५०० रुपये दिले जातात, त्याशिवाय नाष्टा व प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. बांधकामासाठी कामगार पुरविणारे कंत्राटदारच नाका कामगार आणि नेते यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावतात. त्यामुळे वेळापत्रकानुसार या कामगारांना निश्चित ठिकाणांवर सोडण्याची जबाबदारी काही कंत्राटदारांनी घेतल्याचे समजते.

हे देखील वाचा: Mumbai News: मुंबईत थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनपूर्वी पालिकेचा ‘फायर अलर्ट’! हॉटेल्स, पब आणि मॉल्सवर धाडी; ७३१ आस्थापनांची तपासणी

उपाशीपोटी प्रचारात झोकून देणारे कार्यकर्ते कालबाह्य

उपाशीपोटी प्रचारात झोकून देणारे कार्यकर्ते आता कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रचारासाठी आता नाका कामगारांची गरज भासू लागली आहे. प्रचाराची पत्रके वाटणे, फलक व होर्डिंग लावणे, रॅलीतील गर्दी वाढविणे, घोषणा देणे आदी कामांसाठी बहुतांशी नेत्यांची भिस्त नाका कामगारांवर असल्याचे दिसून येते. त्यातल्या त्यात प्रचाराच्या रॅलीसाठी महिला कामगारांना अधिक पसंती असल्याचे समजते.

गेल्या आठ दिवसांपासून कामगारांची सख्या रोडावली

दिघा (महापालिका तलाव), ऐरोली नाका, नोसिल नाका, घणसोली (दगडू चाहू पाटील चौक), कोपरी गाव (हनुमान मंदिर सर्कल), कोपरखैरणे (रांजणदेवी चौक), कोपरखैरणे (सेक्टर ६), वाशी (सेक्टर १५), नेरूळ (एलपी सिग्नल), तुर्भे नाका, पावणे गाव, सीबीडी (सेक्टर २) ही शहरातील काही प्रमुख कामगार नाके आहेत. मागील आठ दिवसांपासून या नाक्यांवरील कामगारांची संख्या रोडावल्याचे दिसून आले आहे.

हे देखील वाचा: Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?

Web Title: The elections will bring prosperous times for dockworkers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 06:13 PM

Topics:  

  • Election News
  • Maharashtra Local Body Election
  • Mumbai
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Thane Metro : ठाण्याच्या आतील भागातून धावणार ‘ही’ मेट्रो! रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी, कधी सुरु होणार जाणून घ्या
1

Thane Metro : ठाण्याच्या आतील भागातून धावणार ‘ही’ मेट्रो! रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी, कधी सुरु होणार जाणून घ्या

आता म्हाडाचं घर घेणं झालं सोपं! कोकण मंडळ स्वतः मिळवून देणार गृहकर्ज; १२ हजार घरांच्या विक्रीसाठी मोठा निर्णय
2

आता म्हाडाचं घर घेणं झालं सोपं! कोकण मंडळ स्वतः मिळवून देणार गृहकर्ज; १२ हजार घरांच्या विक्रीसाठी मोठा निर्णय

Mumbai Crime News : बिर्याणीने घेतला पत्नीचा जीव! जेवणात मीठ जास्त झालं म्हणून इंजिनिअरनं केली २० वर्षीय पत्नीची हत्या
3

Mumbai Crime News : बिर्याणीने घेतला पत्नीचा जीव! जेवणात मीठ जास्त झालं म्हणून इंजिनिअरनं केली २० वर्षीय पत्नीची हत्या

ठरलं! राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस निवडणुका एकत्र लढणार; पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा
4

ठरलं! राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस निवडणुका एकत्र लढणार; पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.