Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प”,नरेंद्र पवारांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभियानाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत कल्याण जिल्हा भाजपची कार्यशाळा संपन्न झाली. त्यामध्ये उपस्थित भाजप पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधताना पवार यांनी हे आवाहन के

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2025 | 05:27 PM
"समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प",नरेंद्र पवारांचे आवाहन

"समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प",नरेंद्र पवारांचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली: समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहचवण्याचा भाजपचा हा प्रामाणिक प्रयत्न असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित येणारे सेवा पंधरवडा अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यात यावे असे आवाहन कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभियानाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत कल्याण जिल्हा भाजपची कार्यशाळा संपन्न झाली. त्यामध्ये उपस्थित भाजप पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधताना पवार यांनी हे आवाहन केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती म्हणजेच २ ऑक्टोबर दरम्यान भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवडा २०२५ साजरा करण्यात येणार आहे. या सेवा पंधरवड्यात विविध लोककल्याणकारी उपक्रम आयोजित करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे नुकतीच कल्याण जिल्हा कार्यशाळा संपन्न झाली.

Thane News : SRA योजनेत रहिवाशांची फसवणूक; तक्रारीनंतर अधिकाऱ्यांची खरडपट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या अभियानाअंतर्गत रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, दिव्यांग व्यक्ती सन्मान आणि उपकरण वितरण, “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण, भूतपूर्व कार्यकर्त्यांचा सन्मान, कार्यकर्त्यांच्या घरी भोजन, “वोकल फॉर लोकल” उपक्रम, स्थानिक मेळावे आणि “मोदी विकास मॅरेथॉन” अशा विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तर आपण सर्वांनी या अभियानात सक्रियपणे सहभागी होऊन समाजसेवेची ही चळवळ अधिक व्यापक करण्याची अपेक्षा व्यक्त करत हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही पवार यांनी केले.

या कार्यशाळेस भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब, अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे तसेच कल्याण जिल्हामधील सर्व मंडल अध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यशाळेत सेवा पंधरवड्याच्या काळात राबविण्यात येणारे उपक्रम तसेच वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे या विविध लोककल्याणकारी उपक्रमांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकावर सर्वसामान्य लोकांसाठी ” मोफत वाचनालय ” सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Navi Mumbai : NMT कडून प्रवाशांची अडवणूक; पनवेल रेल्वे स्थानक मार्गावर प्रवाशांची गैरसोय

Web Title: Former mla narendra pawar bjp sincere resolution to reach service sensitivity and development to all sections of society

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra

संबंधित बातम्या

Aditi Tatkare : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा, आदिती तटकरे यांचे निर्देश
1

Aditi Tatkare : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा, आदिती तटकरे यांचे निर्देश

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य,पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
2

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य,पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

भाजप आमदार Hardik Patel यांच्या अडचणी वाढल्या, अहमदाबाद ग्रामीण न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी
3

भाजप आमदार Hardik Patel यांच्या अडचणी वाढल्या, अहमदाबाद ग्रामीण न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

मोखाड्यात अवैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात, 6.15 लाख रुपयांचा मद्य साठा जप्त
4

मोखाड्यात अवैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात, 6.15 लाख रुपयांचा मद्य साठा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.