१. महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार.
२. निवडणुकीआधी शिवसेनेत इनकमिंग वाढले.
३. महायुती आणि महाविकास आघाडीने सुरु केली निवडणुकीची तयारी
Maharashtra Politics: महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असल्याचे दिसून येत आहे. लवकरच अमळनेर येथील एक नेता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याचा अंदाज आहे. या निवडणूक टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. याआधीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद वाढताना दिसून येत आहे. लवकरच अमळनेर येथील एक माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिरीष चौधरी हे अमळनेरचे माजी आमदार आहेत. ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.
लवकरच शिरीष चौधरी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. शिरीष चौधरी यांच्यासोबत जवळपास ४०० ते ५०० कार्यकर्ते ते पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिरीष चौधरी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे. असे झाल्यास जळगाव, अमळनेरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
महापालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. या बाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) आता नव्या प्रभाग रचनेनुसार, ओबीसी आरक्षणासह होणार आहे. सुप्रीम कोर्टाने याला हिरवा कंदील दाखवला आहे. नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.
Local Body Elections: मोठी बातमी! महापालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘ही’ याचिका फेटाळली
सुप्रीम कोर्टाने नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्याने आता लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. आता निवडणूक ही ओबीसी आरक्षणासह आणि नव्या प्रभाग रचनेसह होणार आहेत. नवीन वॉर्ड रचनेनुसार या निवडणुका होऊ शकतात. राज्यातील महापालिकांवर खूप कालावधीपासून प्रशासक कार्यरत आहेत. मात्र आता या सर्व निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. २७ टक्के आरक्षणासहच आता मनपा निवडणुका होणार आहेत.