sambhaji raje
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्रामला राजकीय वर्तुळात ताकद देण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना आमदार करा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संभाजीराजे यांनी आज विनायक मेटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
[read_also content=”गोविंदाना वेगळं आरक्षण नाही, खेळाच्या कोट्यातीलच आरक्षण देण्यात येणार – देवेंद्र फडणवीस https://www.navarashtra.com/maharashtra/the-reservation-for-govinda-in-the-sports-quota-was-cleared-by-deputy-chief-minister-fadnavis-nrps-318323.html”]
विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी संभाजीराजे मेटे यांच्या घरामध्ये दाखल होताच त्यांच्या बहिणीला अश्रु अनावर झाले. “माझ्या भावाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य खर्ची घातलं. त्याचा लढा आता तुम्ही पुढे चालू ठेवा, अशी भावनिक सादही यावेळी विनायक मेटे यांच्या बहिणीने संभाजीराजे यांना घातली.
यावेळी संभाजीराजेंनी विनायक मेटे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या कामाच्या आठवणीला उजाळाही दिला. मी सदैव मेटे कुटुंबियांच्या सोबत असून विनायक मेटे यांचा अपूर्ण राहिलेला मराठा आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जाणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले.