Four men beat up woman attempt to chop off her leg over land dispute in Beed crime news
Beed Crime News : बीड : बीडमध्ये गुन्हेगारी रोज नवे थरकाप उडवणारे प्रसंग समोर येत आहेत. बीडमधील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. संतोष देशमुख यांची निर्घृण अन् निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता पुन्हा एकदा बीडमधील शेतीतील वादामुळे भांडण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या भांडणांमध्ये महिलेचा पाय कापण्याचा प्रयत्न चार जणांनी मिळून केला आहे. त्यामुळे बीडमधील गुन्हेगारीला कोण आळा घालणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात भावकीतील वादातून भयंकर प्रकार घडणार असल्याचे दिसून आले. यामध्ये चार जणांनी एका महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिता आश्विनी येडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे बीडमधील गुन्हेगारी दिसून आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी देखील आरोपीकडून तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. इतर महिलेला मारहाण करतानाचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. महिलांना अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा असून बीड जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रकरणाचा नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे कुटुंब मोठ्या दहशतीत असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आरोपींना जेरबंद करा अशी मागणी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वाल्मिक कराड हा या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तो जेलमध्ये असताना देखील त्याचे कार्यकर्ते बाहेर त्याच्या समर्थनार्थ बाहेर प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. कराडच्या समर्थनासाठी स्कॅनर आणि बॅनर फिरत आहे.वाल्मिक (आण्णा) कराड संघटना मित्र मंडळाकडून हे पोस्टर छापण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराडच्या अर्थिक मदतीच्या या पोस्टरवर मुंडे कुटुंबाचा देखील फोटो छापण्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या या पोस्टरवर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो छापण्यात आला आहे.याचबरोबर भगवान बाबा आणि भगवान बाबा गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. यावरुन आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.वाल्मीक (अण्णा) कराड संघटना मित्र मंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर ‘वाल्मीक अण्णाचे नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे., फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील.. थोडीशी मदत.. आण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी’ अशा मजकुराचे हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याचबरोबर क्युआर कोडदेखील देण्यात आला आहे.