रक्षाबंधन होऊनही अंगणवाडीसेविका अद्यापही 'त्या' भत्त्याच्या प्रतिक्षेत; मिळतीये 'तारीख पे तारीख'
Fraud in Ladki Bhain Scheme: राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या असलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आलेआहेत. महिलांऐवजी राज्यातील १४,२९८ पुरुषांनीच या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. ऑगस्ट २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत या पुरुषांच्या खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा होत होते. सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटाची पडताळणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या गैरव्यवहारामुळे सरकारचे २१.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. सध्या संशयित लाभार्थ्यांची तपासणी सुरू असून, त्यांचा आर्थिक लाभ तात्काळ बंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटाची पडताळणी केल्यानंतर हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. राज्यातील महिलांसाठी असलेल्या या योजनेचा १४,२९८ पुरुषांनी तब्बल १० महिने लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रत्येकी १,५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात. पण, एकूण २१.४४ कोटी रुपये पुरुषांच्या खात्यात गेले आहेत. ऑगस्ट ते जून या कालावधीत सातत्याने पैसे जमा होत असतानाही हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात का आला नाही, असे प्रश्न उपस्थित झाले आहे.
Maharashtra Politics: राजकारणात ट्विस्ट! धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांचे सूचक वक्तव्य
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला वर्षभरात तब्बल ४२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यातील जवळपास २१.४४ कोटी रुपये हे चुकीने पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे. ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली होती. या योजनेसाठी सर्वाधिक निधी खर्च होत असल्याने इतर अनेक योजनांना फटका बसत असल्याची माहिती आहे.
पुरुष असूनही महिलांची नावे वापरली. पडताळणीदरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तब्बल २,३६,०१४ लाभार्थ्यांच्या नावांबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. हे लाभार्थी प्रत्यक्षात पुरुष असून त्यांनी महिलांची नावे देऊन योजनेचा लाभ घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या सर्व अर्जांची छाननी सुरू असून, संशयित लाभार्थ्यांचा आर्थिक लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे.