Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी महत्त्वाची बातमी; तब्बल 1 कोटी 5 लाख महिलांची नावे वगळणार?

लाडकी बहीण ही योजना सर्वच महिलांसाठी फायद्याची ठरताना दिसत आहे. सुरुवातीला कमी कागदपत्रांच्या आधारे मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले आणि त्यांना काही महिने लाभही मिळाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 10, 2026 | 08:26 AM
राज्यातील 'लाडक्या बहिणीं'साठी महत्त्वाची बातमी; तब्बल 1 कोटी 5 लाख महिलांची नावे वगळणार?

राज्यातील 'लाडक्या बहिणीं'साठी महत्त्वाची बातमी; तब्बल 1 कोटी 5 लाख महिलांची नावे वगळणार?

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्रतेच्या तपासणीनंतर मोठ्या संख्येने महिला या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक कोटी 5 लाख महिला विहित निकषांवर पात्र ठरत नाहीत. हेच लक्षात घेऊन यावर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ १.४८ कोटी लाभार्थ्यांसाठी २६५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा योजनेच्या बजेटमध्ये सुमारे १९ हजार कोटी रुपयांची कपात करण्यात आली.

लाडकी बहीण ही योजना सर्वच महिलांसाठी फायद्याची ठरताना दिसत आहे. सुरुवातीला कमी कागदपत्रांच्या आधारे मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले आणि त्यांना काही महिने लाभही मिळाला. मात्र, डिसेंबर २०२४ पासून पात्रतेची सविस्तर तपासणी सुरू करण्यात आली. या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. आता ई-केवायसीद्वारे कुटुंबाच्या वास्तविक उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. कारवाई टाळण्यासाठी अनेक महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, असे सांगितले जात आहे.

31 मार्चपर्यंत ई-केवायसी मुदत

सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च निश्चित केली आहे. १ एप्रिलपासून केवळ त्याच महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील, ज्या सर्व पात्रता निकष पूर्ण करतील. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, सर्व लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत तपासणी करण्यात आली असून, पात्र महिलांनाच पुढे योजनेचा लाभ दिला जाईल.

योजनेची सद्यस्थिती काय?

– सुरुवातीचे लाभार्थी : २.५३ कोटी
– सुरुवातीचे बजेट : ४५००० कोटी रुपये
– तपासणीनंतर संभाव्य पात्र लाभार्थी : १४८६००००
– २०२६-२७ बजेटमध्ये तरतूद : २६५०० कोटी
– संभाव्य अपात्र महिला सुमारे १.०५ कोटी

योजनेचे प्रमुख पात्रता निकष काय?

– लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे
– कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता कोणतेही चारचाकी वाहन नसावे

– कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच लाभ घेऊ शकतात
– महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी

– कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे
– लाभार्थी महिला शासकीय कर्मचारी नसावी

हेदेखील वाचा : ‘लाडक्या बहिणी’मुळे अन्य खात्यांवर येतोय आर्थिक ताण; आता योजना बंद होणार का? मंत्री नाईक म्हणाले…

Web Title: Names of 1 crore women likely to be excluded from ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • Government Scheme
  • Ladki Bahin Yojana

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी; महिलांची धाकधूक वाढली
1

मोठी बातमी ! आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी; महिलांची धाकधूक वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.