Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad News: कराडच्या लेकींची आयआयटी मुंबईच्या स्पर्धेत बाजी! ‘इकोपल्स बस स्टॉप’ प्रकल्पाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक

शिक्षण मंडळ कराड संचालित महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आयआयटी मुंबई आणि हनीवेल आयोजित राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला आहे

  • By anuradha sagar
Updated On: Mar 31, 2026 | 11:32 AM
Karad News 2026, Karad Women's College Success, IIT Mumbai Research Competition

Karad News 2026, Karad Women's College Success, IIT Mumbai Research Competition

Follow Us
Follow Us:
  • शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालयाचे दुहेरी यश
  • पर्यावरणपूरक ‘इकोपल्स बस स्टॉप’ संकल्पनेने जिंकली परीक्षकांची मने
  • भविष्यकालीन कौशल्यांच्या शर्यतीत कराडचे महिला महाविद्यालय अव्वल
 

Karad News: शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालयाने राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत दुहेरी यश संपादन करत आपली गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे. वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे आयोजित या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि हनीवेल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर फ्युचर स्किल्स अँड इनोव्हेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचा विषय ‘शाश्वत विकासासाठी भविष्यकालीन कौशल्ये’ असा होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रकल्पांनी परीक्षकांची मने जिंकली.

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल

वैष्णवी कदम, समिक्षा थोरात, प्रणाली पवार आणि रझिया नदाफ यांच्या संघाने सादर केलेल्या ‘इकोपल्स बस स्टॉप’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. पर्यावरणपूरक व ऊर्जा बचतीच्या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पाने विशेष लक्ष वेधले.

तसेच, सुहाना मनियार, कल्याणी पाटील आणि श्रेया पाटील यांच्या संघाने सादर केलेल्या ‘स्मार्ट अर्बन ग्रीन कॉरिडॉर्स’ या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. शहरांमध्ये हरित पट्टे निर्माण करून पर्यावरण संतुलन राखण्याच्या संकल्पनेवर हा प्रकल्प आधारित होता.

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

दोन्ही संघांना वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुहासिनी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाइस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

 

Web Title: From karad to iit fame students win laurels for sustainable development research

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Educational News
  • Satara News
  • Sports News

संबंधित बातम्या

जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी, मेढा आगार प्रमुखांना निवे
1

जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी, मेढा आगार प्रमुखांना निवे

Satara News: माऊलींच्या पालखी स्वागतासाठी सातारा पोलीस सज्ज;  महत्त्वाच्या ठिकाणांचा आढावा
2

Satara News: माऊलींच्या पालखी स्वागतासाठी सातारा पोलीस सज्ज; महत्त्वाच्या ठिकाणांचा आढावा

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक
3

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
4

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.