Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसबा विधानसभा मतदार संघाचा निधी पर्वतीला; आमदार धंगेकर यांचा आंदोलनाचा इशारा

कसबा मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी, अचानकपणे पर्वती मतदार संघातील कामांकरिता वळवण्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. कसबा मतदारसंघाचा हा हक्काचा निधी पुन्हा कसब्याला द्यावा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2023 | 02:37 PM
कसबा विधानसभा मतदार संघाचा निधी पर्वतीला; आमदार धंगेकर यांचा आंदोलनाचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कसबा मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी, अचानकपणे पर्वती मतदार संघातील कामांकरिता वळवण्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. निविदा प्रक्रियेपर्यंत आलेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघाला देणे कसब्याच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री, पालकमंत्री व नगरविकास विभागाने कसबा मतदारसंघाचा हा हक्काचा निधी पुन्हा कसब्याला द्यावा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

रवींद्र धंगेकर म्हणाले, “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी- सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. रस्ते, सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, शौचालय दुरुस्ती, फुटपाथ, विसर्जन घाट, उद्यान विकास अशी जवळपास १०० विकासकामे प्रस्तावित होती. २० डिसेंबर २०२२ रोजी नगर विकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही कामे मंजूर होऊन त्यासाठी १० कोटींचा निधी मान्य करण्यात आला होता.”

“मात्र, २७ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय शुध्दीपत्रक काढून, हा निधी कसबा मतदारसंघातील कामांऐवजी पर्वती मतदार संघामध्ये वळवण्यात आला. हा प्रकार कसबा मतदार संघातही जनतेवर अन्याय करणारा आहे. विकासकामामध्ये सत्ताधारी राजकारण करू पाहत आहे. कसब्यातील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षातील आमदार असल्याने सत्ताधारी पक्षाकडून हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे की काय, अशी शंका आमच्या मनात येत आहे.

जाणूनबुजून कसबा मतदार संघाला डावलण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेवर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही. या शासन निर्णय बदल करुन पुन्हा कसबा मतदार संघाचा निधी परत द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत,” असेही रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

कसबा मतदारसंघाचा निधी पर्वती मतदारसंघात वळवणे हा कसब्याच्या जनतेचा आणि आधीच्या आमदार मुक्ताताई टिळक यांचा अपमान आहे. ही कामे मुक्ताताई टिळक यांनी प्रस्तावित केली होती. त्यांच्याच कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मी करतो आहे. असे असताना निधी वळवण्याचा प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दिसतील तिथे निदर्शने करणार असल्याचा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला. यासंदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव, आयुक्त या सर्वांनाच पत्रव्यवहार केला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Fund of kasba vidhan sabha constituency partila mla dhangekars warning of agitation nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 02:36 PM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • MLA ravindra dhangekar

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
1

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ
2

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
3

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत ४४७ मतदान केंद्रे संवेदनशील; गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक केंद्रे
4

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत ४४७ मतदान केंद्रे संवेदनशील; गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक केंद्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.