Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमर रहे, अमर रहे…बापटसाहेब अमर रहे’; खासदार गिरीश बापट यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 'अमर रहे, अमर रहे...बापट साहेब अमर रहे,' अशा घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2023 | 07:18 PM
‘अमर रहे, अमर रहे…बापटसाहेब अमर रहे’; खासदार गिरीश बापट यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप
Follow Us
Follow Us:

पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘अमर रहे, अमर रहे…बापट साहेब अमर रहे,’ अशा घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

गेल्या दोन वर्षापासून ते दुर्धर आजाराशी झुंजत होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काल रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर बुधवारी सकाळी बापट यांचे निधन झाले. त्यामुळे पुण्याच्या राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली. दुपारी दोन ते सांयकाळी पाच या वेळेत बापट यांचे पार्थिव शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

पुणे पोलिस दलाच्या वतीने बापट यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज ठेवण्यात आला. त्यानंतर शेकडो नागरिकांनी बापट यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. सायंकाळी पाच वाजता फुलांनी सजविलेल्या गाडीत त्यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा सुरु झाली. अंत्ययात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर विविध संघटना, गणेश मंडळांनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच मार्गावर विविध पक्षांच्या वतीने श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते. वैकुंठ स्मशानभूमीत पुणे पोलिस दलाच्या वतीने खासदार बापट यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, खासदार प्रकाश जावडेकर, श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Funeral of mp girish bapat in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2023 | 07:18 PM

Topics:  

  • BJP
  • Girish bapat
  • maharashtra
  • political news
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात
1

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
2

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
3

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
4

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.