Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पा झाले विराजमान; वर्षा बंगल्यावर बाप्पाचे जल्लोषात स्वागत

राज्यामध्ये सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पा विराज होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वर्षा बंगल्यावर गणरायाचे जोरदार स्वागत केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 07, 2024 | 05:39 PM
ganapati bappa at political leader house

ganapati bappa at political leader house

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष आहे. घराघरामध्ये बाप्पा विराजमान झाला असून सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरण आहे. राजकीय नेत्यांच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. मोठ्या उत्साहामध्ये गणपती बाप्पा विराजनाम झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय निवासस्थानी तसेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या निवासस्थानी देखील बाप्पाचे स्वागत करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील गणरायाचे आगनम झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक गणरायाची पुजा केली. तसेच आरती केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भक्तीभावामध्ये तल्लीन झालेले दिसले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील उपस्थिती होती. मोठ्या उत्साहामध्ये वर्षावर गणरायाचे स्वागत करण्यात आले.

वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा।।

गणेश चतुर्थीच्या पवित्र दिनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना पूजा संपन्न झाली.

या मंगल प्रसंगी माझी पत्नी सौ.लता शिंदे, पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्नुषा… pic.twitter.com/NNDy7wx0ep

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 7, 2024

सागर बंगल्यावर जल्लोष

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील गणरायाचे स्वागत करण्यात आले आहे. धुमधडाक्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवास्थानी गणपती बाप्पा विराजमान झाला. फुलांची भव्य आरास आणि बाप्पाची सुंदर मूर्ती मन मोहक दिसत होती. यावेळी फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत बाप्पाची आरती केली. प्रसन्नमयी वातावरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.

🌺 दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे श्री गणरायाच्या मूर्तीची सहकुटुंब प्राणप्रतिष्ठा केली. माझ्या मुंबई येथील निवासस्थानी आज बाप्पांचे आगमन झाले.@fadnavis_amruta#Maharashtra #GaneshChaturthi pic.twitter.com/B6jR3tZC8S

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 7, 2024

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

गणेशोत्वासाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गणेशोत्सव हा एक उत्साह आणणारा सण आहे. आज गणेश पर्वची सुरुवात होत असल्यामुळे खुशीचे वातावरण आहे. देशातील आणि जगभरातील सर्व गणेशभक्तांना मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील उत्साह तर तुम्हाला दिसत आहेच. गणेशाच्या चरणी मी मागणी करेल की सर्वांना सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो. तसेच आपला देश आणि आपलं राज्य महाराष्ट्र नेहमी प्रगतीपथावर राहू दे. त्याच्यासमोर जे विघ्न येईल ते दूर होऊ दे अशी मी प्रार्थना करतो,” अशा शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

Web Title: Ganapati bappa at the house of political leaders eknath shinde devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 05:39 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • ganesh charuthi

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा, ‘या’ बाईक-स्कूटरवर असेल खास डिस्काऊंट; एक्स्टेंडेड वॉरंटी सुद्धा मिळणार
2

Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा, ‘या’ बाईक-स्कूटरवर असेल खास डिस्काऊंट; एक्स्टेंडेड वॉरंटी सुद्धा मिळणार

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
4

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.