Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेश नाईक अडचणीत! ‘बिबट्याची आणि हरणाची पिल्ले पाळली होती’ या वक्तव्यावरून शिंदे गटाचे किशोर पाटकर संतप्त

कार्यक्रमात बोलताना मंत्री नाईक यांनी सांगितले की,“मी देखील बिबट्याची पिल्ले आणि हरणाची पिल्ले पाळली होती. परंतु वनमंत्री झाल्यावर ही बाब कायदेशीर नाही म्हणून मी त्यांना सोडून दिले.”

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 14, 2025 | 07:17 PM
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर किशोर पाटकरांचा संताप (Photo Credit- X)

वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर किशोर पाटकरांचा संताप (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई: सोमवारी वाशी येथे झालेल्या खाटीक समाजाच्या मेळाव्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या कार्यक्रमात बोलताना मंत्री नाईक यांनी सांगितले की,“मी देखील बिबट्याची पिल्ले आणि हरणाची पिल्ले पाळली होती. परंतु वनमंत्री झाल्यावर ही बाब कायदेशीर नाही म्हणून मी त्यांना सोडून दिले.”
या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

किशोर पाटकर यांची तीव्र प्रतिक्रिया

विशेषतः बेलापूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत मंत्री नाईक यांच्या जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पत्रकारांना सांगितले की, एखाद्या जबाबदार व्यक्तीने बिबट्याची पिल्ले आणि हरण पाळणे हे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे. जर त्यांना ही पिल्ले सापडली होती, तर त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना किंवा वनविभागाला देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे न करता स्वतःकडे ती ठेवून त्यांचे पालन-पोषण केले, ही बाब गंभीर आहे. त्यांना ही पिल्ले कुणी आणून दिली होती, आणि सध्या ती कुठे आहेत, याचा तपास होणे अत्यावश्यक आहे. कारण हे प्रकरण वन्यजीवांच्या बेकायदेशीर संगोपनाशी निगडित गंभीर बाब आहे.”

Navi Mumbai News: “पालकमंत्री असताना सुधारणा का केली नाही?”, मंदा म्हात्रेंची गणेश नाईकांवर टीका

गणेश नाईक म्हणाले की, बिबट्याची पिल्ले व हरणाचे पिल्लू मी पाळले होते,

“वनमंत्री झाल्यावर मी त्यांना सोडून दिले. यावर शिंदे गट शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर म्हणाले की, जर गणेश नाईक म्हणाले की, वनमंत्री झाल्यावर मी ती पिल्ले सोडून टाकली. तर याच दुसरा अर्थ असा होतो की, गणेश नाईक वनमंत्री झाले नसते तर त्यांनी ती पिल्ले स्वतःकडे ठेवली असती. असा दुसरा अर्थ त्यांच्या वक्तव्याचा होत आहे. जंगली प्राणी पाळणे अथवा आपल्याकडे ठेवणे हा गुन्हा आहे हे इतकी वर्ष शासनात वावरणाऱ्या मंत्र्याला माहीत नसणे याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे त्यांचे वक्तव्य करणे म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस आहे. मंत्री म्हणून ते कायद्याचे पालन करणारे असले तरी त्यांच्या अशा कबुलीजबाबाने चुकीचा संदेश जातो. या प्रकरणात मी वेळ पडल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे असे पाटकर म्हणाले. दरम्यान, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार बिबट्या, हरिण यांसारख्या प्राण्यांना पाळण्याच्या गुन्ह्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

Web Title: Ganesh naik in trouble raised leopard deer cubs shinde factions kishor patkar furious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 07:01 PM

Topics:  

  • Ganesh Naik
  • maharashtra
  • Vashi

संबंधित बातम्या

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत
1

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत

महाराष्ट्र आणि जमर्नीतील ‘या’ राज्यामध्ये करार! परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
2

महाराष्ट्र आणि जमर्नीतील ‘या’ राज्यामध्ये करार! परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

पुण्यात अभ्यासिकांसाठी नियंत्रण नियमावली हाेणार; नेमकं काय करणार उपाययाेजना?
3

पुण्यात अभ्यासिकांसाठी नियंत्रण नियमावली हाेणार; नेमकं काय करणार उपाययाेजना?

IMD Weather Update : हुडहुडी! ऐन थंडीत पावसाचा कहर, ‘या’ तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा
4

IMD Weather Update : हुडहुडी! ऐन थंडीत पावसाचा कहर, ‘या’ तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.