गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा अभ्यास....
Thane Politics : ठाणे जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांत संघर्षाचे नवे रणांगण उभे राहताना दिसत आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला असून नाईक सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत.
अलीकडील एका कार्यक्रमात गणेश नाईक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता थेट शिंदे गटावर टीकेचे बाण सोडले. त्यांच्या या हल्लाबोलानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नाईकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी काळात या संघर्षाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कठीण काळात अनिल अंबानीची लागली लॉटरी, बँक खात्यात येणार रू. 1000000000, विदेशात झाली तगडी ‘डील’
गणेश नाईक यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, “हे सगळं बोलताना मुख्यमंत्री महोदयांना हे मान्य आहे का? हे आधी त्यांनी विचारून घ्यावं. नंतरच डायरेक्ट-इनडायरेक्ट आरोप करावेत. आता काही लोकांना वाण नाही पण गुण लागतो. तसा शिवीगाळ करण्याचा गुण यांना लागला आहे. नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये असं ते म्हणाले, पण नवी मुंबईची जनता त्यांच्या हाती सत्ता देणार नाही, हे सत्य आहे. नालायक कोण आहे, याचा अभ्यास त्यांनीच करावा.”
सामंत यांनी पुढे खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर टीका करण्याबाबतही इशारा दिला. “आमच्या खासदारांना बोलता येत नाही का? आमच्या जिल्हाप्रमुखांना बोलता येत नाही का? पण साहेबांचं सांगणं असतं की भाजपमध्ये काम करणाऱ्या नेत्यांवर टीका करू नका. या गोष्टी सर्वांनीच सांभाळल्या पाहिजेत,” असा टोलाही उदय सामंतांनी यावेळी लगावला.
गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून
नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये आणि त्यामुळेच त्यांच्या हाती सत्ता जाणार नाही. समन्वय समिती ही संवाद साधण्यासाठीच स्थापन करण्यात आली आहे. उठसूट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सहन केली जाणार नाही. असा इशाराही उदय सामंतानी दिला. तसेच, नाईकांना काही अडचणी असतील तर त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी. ज्याची ज्या पद्धतीने कुवत असते, त्यानुसारच त्याला पद मिळते. आमच्या खासदारांनाही बोलण्याचा अधिकार आहे; मात्र साहेब सांगतात की मित्र पक्षावर भाष्य करू नका, म्हणूनच सर्वजण शांत आहेत, असेही सामंतांनी स्पष्ट केले.
शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधत गणेश नाईक म्हणाले, “तुम्ही भविष्याचा विचार करणार आहात की नाही? नवीन एफएसआय लागू झाला, तर या शहराचे मोठे नुकसान होईल. आज नवीन मुंबईत काही ठिकाणीच पाणी साचते, तुंबापूरी होत नाही. कारण आपण नाल्यांची रचना नीट केली आहे. पण जर नालायक लोकांच्या हाती नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता गेली, तर या शहराचे वाटोळे होईल,” असा इशारा त्यांनी दिला.
”हे मी जबाबदारीने सांगतो आहे. माझ्या मनात कुणाविषयी द्वेष नाही. मी सुखी आहे. जो पैसा माझी झोप उडवील, तो पैसा मला नको आहे. आयटीचे लोक येतील, लुटारू येतील, सीबीआय येईल… पण मला त्याची चिंता नाही. मला सुखाची झोप मिळते, मग असा पैसा कशाला? माझा हात स्वच्छ आहे आणि मनही स्वच्छ आहे,” असे सांगत नाईक यांनी शिंदेंना नाव न घेता टोला लगावला.