Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक; ‘इथं’ चक्क मशिदीत केली गेली गणपती प्रतिष्ठापना

गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आल्याने शहरातील हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी एकत्रितपणे भक्तिमय वातावरणात हे सण साजरे केले. यावर्षी मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापनेचे ४२ वे वर्ष साजरे होत असून, हा सलोख्याचा वारसा अधिक दृढ होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 29, 2025 | 03:00 PM
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक; 'इथं' चक्क मशिदीत गणपती प्रतिष्ठापना

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक; 'इथं' चक्क मशिदीत गणपती प्रतिष्ठापना

Follow Us
Close
Follow Us:

कुरुंदवाड / सुरेश कांबळे : कुरुंदवाड हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे जिवंत उदाहरण मानले जाते. शहरातील गणेशोत्सव आणि मोहरम हे सण गेल्या चार दशकांपासून धार्मिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम समाजबांधव शहरातील पाच मशिदीत दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे सेवा करतात. पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांच्या पिढीजात वारसांनी आजही तितक्याच श्रद्धेने अबाधित ठेवली आहे.

कुडेखान बडेनाल साहेब मशीद, ढेपनपूर मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद आणि कारखाना मशीद या पाच मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. १९८२ साली पीर-पंजा कमिटीचे कै. गुलाब गरगरे, कै. उस्मान दबासे, कै. दिलावर बारगीर, कै. मौला जमादार, कै. वली पैलवान, कै. रमजान घोरी आदींनी गणेशोत्सव आणि मोहरम एकाच वेळी आल्याने मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला. याच घटनेपासून शहरात धार्मिक एकात्मतेच्या या अनोख्या परंपरेची सुरुवात झाली.

२०१८ ते २०२० या तीन वर्षांत पुन्हा एकदा गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आल्याने शहरातील हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी एकत्रितपणे भक्तिमय वातावरणात हे सण साजरे केले. यावर्षी मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापनेचे ४२ वे वर्ष साजरे होत असून, हा सलोख्याचा वारसा अधिक दृढ होत आहे. कुरुंदवाडमधील हे प्रेम एकतर्फी नसून दोन्ही समाज समभावाने एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होतात.

पिराला दाखवतात मोदकांचा नैवेद्य

मोहरमाच्या वेळी हिंदू बांधव पिराला मोदकांचा नैवेद्य दाखवतात, तर गणेशोत्सवात मुस्लीम बांधव रोठा, चोंगे व मलिद्याचा नैवेद्य अर्पण करून गणरायाच्या भक्तीत सहभागी होतात. राज्यात अनेक ठिकाणी जातीय दंगली उसळल्या तरी कुरुंदवाडमधील ऐक्यावर त्याचा कधीच परिणाम झाला नाही. उलट मशिदीत होणाऱ्या गणपती प्रतिष्ठापनेचा आदर्श इतरांनी घ्यावा, असा संदेश कुरुंदवाडकरांनी दिला आहे.

गणरायाच्या सेवेत आम्ही मनापासून सहभागी

मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. गणरायाच्या सेवेत आम्ही मनापासून सहभागी होतो. कुरुंदवाडमध्ये हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र सण-उत्सव साजरे करतात, हीच खरी ताकद आहे. आम्ही सुरू केलेला सलोख्याचा वारसा पुढच्या पिढ्यांनीही तितक्याच श्रद्धेने जपावा, हीच आमची इच्छा आहे.

– इब्राहिम बारगीर.

Web Title: Ganesha installation done in a mosque in kurundwad kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Ganapati Festival
  • Ganesh Chaturthi 2025
  • ganeshotsav 2025
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव
1

Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध १४० वर्षांची परंपरा असलेले आजोबा गणपती
2

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध १४० वर्षांची परंपरा असलेले आजोबा गणपती

गणेशोत्सव पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड; सोशल मीडिया रिल्स अन् ब्लाँगर स्पर्धेचे आयोजन
3

गणेशोत्सव पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड; सोशल मीडिया रिल्स अन् ब्लाँगर स्पर्धेचे आयोजन

व्हा Creative, व्हा ऍक्टिव्ह! शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाची अनोखी सजावट
4

व्हा Creative, व्हा ऍक्टिव्ह! शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाची अनोखी सजावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.