पुण्यातील गणेश मंडळांचा वाद मिटला (फोटो- istockphoto)
पुणे: लवकरच आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. आनंदाचे वातावरण आहे. चाकरमानी कोकणात जाण्यासाठी आतुर झाले आहेत. बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र पुण्यात एक वाद निर्माण झाला होता. पुण्यात गणेश मंडळांमध्ये विसर्जन मिरावणुकीबाबत वाद निर्माण झाला होता. अखेर हा वाद आता मिटला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने हा प्रश्न अखेर सुटला आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचे ट्वीट काय?
पुण्यनगरीची गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही परंपरेप्रमाणे आणि दरवर्षीच्या क्रमानेच…
व्हिव्हिआयपी सर्किट हाऊस, पुणे
पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचा निर्माण झालेला विषय सुटला असून दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाने मिरवणूक काढण्याचा निर्णय सर्व मंडळांकडून एकमताने घेण्यात आला आहे. यासंदर्भात आमदार हेमंतभाऊ रासने यांच्यासह आज मानाची मंडळे आणि सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेत यावर तोडगा काढला. या बैठकीनंतर मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता सुरू करून परंपरेनुसार मंडळाचे क्रम असतील हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी काही मंडळांनी नियोजित वेळेआधीच विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर मंडळांनी त्यावर विविध मते व्यक्त केली होती. त्यामुळे या विषयाचं काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेची चर्चा जगभरात होत असते.
पुण्यनगरीची गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही परंपरेप्रमाणे आणि दरवर्षीच्या क्रमानेच…
📍व्हिव्हिआयपी सर्किट हाऊस, पुणे
पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचा निर्माण झालेला विषय सुटला असून दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाने मिरवणूक काढण्याचा निर्णय सर्व… pic.twitter.com/nABlgW6NFk
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 22, 2025
देशभरातून हा उत्सव पहायला भाविक मोठ्या संख्येने येत असताना अशावेळी नवे विषय समोर येणे हे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या हिताचे नव्हते. याबाबत सर्व मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत सामोपचाराने आणि एकमताने निर्णय घेण्यास यश आले आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हा एक परिवार असून प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. मात्र हा विषय चर्चेतून सोडवला जाऊ शकतो, यावर माझा विश्वास होता. म्हणूनच सर्वांना एकत्रित येत हा विषय मार्गी लावला आहे. मी हा निर्णय घेण्यासासाठी समजूतीची भूमिका घेणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.
नेमका वाद काय?
यंदाच्या वर्षी पुण्यातील गणेश मंडळांनी नियोजित वेळेआधीच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर अनेक मंडळांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला होता. मात्र केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व आमदार हेमंत रासने यांनी बैठक घेत यावर तोडगा काढला आहे. मंतरो मोहोळ आणि आमदार रासने यांनी गणेश मंडळांची बैठक घेत या वादावर तोडगा काढला आहे.