Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अदानीला 33 हजार कोटी देता, तर आम्हाला 33 हजारांचे कर्ज तरी द्या…”, राष्ट्रवादीची एलआयसीवर धडक

अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्व सामान्य तरूण उद्योजकांना साधे लाखभर रूपयाचेही कर्ज दिले जात नाही. याचा निषेध करण्यासाठी तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीची एलआयसीवर

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 27, 2025 | 06:50 PM
"अदानीला 33 हजार कोटी देता, तर आम्हाला 33 हजारांचे कर्ज तरी द्या...", राष्ट्रवादीची एलआयसीवर धडक

"अदानीला 33 हजार कोटी देता, तर आम्हाला 33 हजारांचे कर्ज तरी द्या...", राष्ट्रवादीची एलआयसीवर धडक

Follow Us
Close
Follow Us:
  • तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे
  • मागणीसाठी एलआयसी कार्यालयावर धडक
  • अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका
ठाणे – अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) वापर केला. एलआयसीवर दबाव आणून ‘अदानी’च्या कंपन्यांमध्ये 33 हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले आहे. एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्व सामान्य तरूण उद्योजकांना साधे लाखभर रूपयाचेही कर्ज दिले जात नाही. याचा निषेध करण्यासाठी तसेच तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे, या मागणीसाठी डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात एलआयसी कार्यालयावर धडक दिली. यावेळी एलआयसी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरूण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावे, अशी मागणी केली.

अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेत या कंपन्यांविरोधात चौकशी सुरू आहे. त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचे ओझे वाढले आहे. त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने एलआयसीवर दबाव आणून अदानी समुहात सुमारे 33 हजार कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. एकाच माणसावर मेहरबान होऊन सर्व सामान्य जनतेचा पैसा उधळण्यास आपला विरोध आहे, असे म्हणत राष्ट्रवादी (श.प.) ने हे आंदोलन केले.

“मतांसाठी भिक मागायला येणारे…” अंबरनाथच्या शास्त्रीनगर भागातील पाणीटंचाईवरून नागरिकांचा राजकीय पुढाऱ्यांवर संताप

दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांनी ,” मोदी सरकार चोर है, मोदी सरकार हाय – हाय, या सरकारचे करायचे काय; वरती डोके खाली पाय; मोदी – अदानी भाई भाई, अशा घोषणा देत तसेच फलक झळकावत एलआयसी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. तसेच विभागिय व्यवस्थापक रूपा भंडारे यांची भेट घेऊन, जर अदानीसारख्या समूहाला पैसे दिले जात असतील तर आमच्यासारख्या गोरगरीब मुलांनाही निधी दिला पाहिजे; आम्हाला व्यवसाय करायचा आहे, अशा आशयाच्या मागण्या आंदोलकांनी केल्या.

याप्रसंगी मनोज प्रधान म्हणाले की, वॉशिंग्टन पोस्टने याबाबत वृत्त दिले आहे. एलआयसीने आता 33 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक अदानी समुहात केली आहे. त्यामुळे एकूण गुंतवणूक 60 हजार कोटी झाली आहे. आमचा सरकारला मूलभूत प्रश्न हात आहे की, अदानींना एअर पोर्ट, बंदरे, रस्ते , रेल्वे दिली जात जात असताना व्यवसायासाठीही सरकारच पैसे द्यावेत, ही कुठला प्रकार ? अन् ही गुंतवणूक अशावेळी केली जात आहे की, हिंडेनबर्गचा अहवाल आला आहे की, अनेक बँका कर्जवसुलीसाठी अदानींच्या मागे लागल्या आहेत. एलआयसीमध्ये 30 कोटी जनतेचा पैसा आहे. हा पैसा सरकारच्या सांगण्यावरून एखाद्या समूहाला देऊ नये. कारण जर हा समुह बुडाला तर जनतेचा पैसाही डुबीत जाईल. त्यामुळे सरकारच्या दबावाला झुगारून एलआयसीने स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा.

Montha चक्रीवादळाचा धोका! मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

Web Title: Give adani 33000 crore rupees at least give us a loan of 33 000 nationalist congress party lashes out at lic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • Adani
  • Jitendra Awhad
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Awhad-Padalkar clashes: विधानभवनातील हाणामारी प्रकरण! आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिफारस
1

Awhad-Padalkar clashes: विधानभवनातील हाणामारी प्रकरण! आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिफारस

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक
2

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?
3

Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप
4

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.