
किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर Sahar Sheikh यांचा माफीनामा (Photo Credit-X)
जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत मुंब्रा प्रभाग ३० मधून विजयी झालेल्या सहर शेख यांनी एका विजयी मिरवणुकीत आक्रमक भूमिका मांडली होती. त्या म्हणाल्या होत्या की, “येत्या काळात संपूर्ण मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकू आणि संपूर्ण मुंब्रा ‘हिरवा’ होईल”. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या भाषणावर आक्षेप घेत मुंब्रा पोलिसांना एक निवेदन दिले होते. सोमय्या यांच्या मागणीनुसार, अशा प्रकारचे वक्तव्य पुन्हा होऊ नये यासाठी पोलिसांनी सहर शेख यांना दोन वेळा पोलीस ठाण्यात पाचारण केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहर शेख यांना भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १६८ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना भविष्यात जातीय सलोखा बिघडवणारे कोणतेही वक्तव्य करू नये, अशी लेखी स्वरूपात सक्त ताकीद देण्यात आली आहे. सहर शेख यांनी आपला लेखी माफीनामा व स्टेटमेंट दिले असून, ते पोलिसांनी किरीट सोमय्या यांना दाखवले आहे.
Sahar Shaikh’s APOLOGY AIMIM’s Sahar Sheikh apologised for her speech “We will make Mumbra GREEN” After My complaint, Police sent her Notice & called for explanation During My today’s follow up visit, Munbra Police in written response informed Me about The Apology pic.twitter.com/VhRMLDAKQT — Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 24, 2026
पोलिसांकडे दिलेल्या लेखी निवेदनात सहर शेख यांनी आपली बाजू मांडली आहे. आमच्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून मुंब्राला ‘हिरवे’ बनवण्याचा आमचा केवळ राजकीय उद्देश आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही तिरंग्यासाठी मरायलाही तयार आहोत,” असेही त्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये नमूद केले आहे.
सहर शेख यांच्या विधानाचा समाचार घेताना नवनीत राणा एका कार्यक्रमात म्हणाल्या, “हा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा देश आहे. ‘मुंब्रा हिरवा करू’ ही तुमची स्वप्ने कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत. माझ्यासारखे शिवबांचे भक्त आणि कार्यकर्ते जिवंत असेपर्यंत या देशातून कोणीही भगवा हटवू शकत नाही. आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत”.
“मुंब्र्याला हिरवं करायचं आहे…”; AIMIM नगरसेविका Sahar Sheikh अडचणीत, पोलिसांनी बजावली नोटीस