Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुंब्र्याला हिरवं करायचं आहे…”; AIMIM नगरसेविका Sahar Sheikh अडचणीत, पोलिसांनी बजावली नोटीस

Sahar Sheikh News: ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्यातून विजयी झालेल्या एमआयएमच्या सहर शेख यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 'मुंब्रा हिरवा करू' या त्यांच्या विधानामुळे राजकीय वाद पेटला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 22, 2026 | 07:42 PM
AIMIM नगरसेविका Sahar Sheikh अडचणीत, पोलिसांनी बजावली नोटीस (Photo Credit- X)

AIMIM नगरसेविका Sahar Sheikh अडचणीत, पोलिसांनी बजावली नोटीस (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंब्र्यात आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला खिंडार!
  • एमआयएमच्या सहर शेख यांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
  • पोलिसांनी बजावली नोटीस
Sahar Sheikh News: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. ठाणे महानगरपालिकेत (TMC) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा या बालेकिल्ल्याला असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम (AIMIM) पक्षाने मोठा धक्का दिला. या विजयापेक्षाही सध्या चर्चा रंगली आहे ती नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांची, ज्यांच्या एका विधानाने मुंब्र्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जितेंद्र आव्हाडांना “कैसा हराया..?” असे म्हणत डिवचले

मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३० मध्ये एमआयएमच्या संपूर्ण पॅनलने दणदणीत विजय मिळवला. आव्हाडांचे एकेकाळचे कट्टर समर्थक युनूस शेख यांच्या कन्या सहर शेख यांनी मुंब्र्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. सहर शेख यांनी विजयानंतर थेट जितेंद्र आव्हाडांना आव्हान देत, “कैसा हराया..?” असे म्हणत डिवचले होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

“५ वर्षांत मुंब्र्यात फक्त MIM…”, जितेंद्र आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देणारी Sahar Shaikh कोण आहे?

पोलिसांनी बजावली नोटीस

सहर शेख यांनी विजयानंतर काढलेल्या मिरवणुकीत एक आक्रमक विधान केले होते. त्या म्हणाल्या, पुढील निवडणुकीत आम्ही संपूर्ण मुंब्रा विधानसभा मतदारसंघ जिंकू. विरोधकांना येथून हाकलून लावू आणि मुंब्र्यातील प्रत्येक उमेदवार एमआयएमचाच असेल. येत्या काळात संपूर्ण मुंब्रा ‘हिरवा’ होईल. या वादग्रस्त विधानाची दखल घेत मुंब्रा पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ नुसार नोटीस बजावली आहे. समाजात असंतोष किंवा तेढ निर्माण होईल असे कोणतेही भाषण करू नये. इंटरनेट किंवा सोशल मीडियावर बोलताना संयम बाळगण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

राज्यात एमआयएमची मोठी झेप

राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी १३ महानगरपालिकांमध्ये एमआयएमने आपली ताकद दाखवली आहे. एकूण १२५ जागांवर पक्षाने विजय मिळवला असून, एकट्या ठाणे महानगरपालिकेत ५ उमेदवार निवडून आले आहेत. या निकालांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहेत सहर शेख?

सहर शेख या मुंब्र्यातील वजनदार नेते युनूस शेख यांच्या कन्या आहेत. युनूस शेख हे पूर्वी जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते, मात्र काही काळापूर्वी त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या मुलीने थेट आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Awhad-Padalkar clashes: विधानभवनातील हाणामारी प्रकरण! आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिफारस

Web Title: Aimim corporator sahar sheikh is in trouble the police have issued her a notice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • AIMIM
  • Jitendra Awhad
  • muncipal corporation
  • Thane Municipal Corporation

संबंधित बातम्या

Sangali Election 2026 : महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ चे बटन दाबून दर्शवली नाराजी; 31 हजार सांगलीकरांचा उमेदवारांना नकार
1

Sangali Election 2026 : महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ चे बटन दाबून दर्शवली नाराजी; 31 हजार सांगलीकरांचा उमेदवारांना नकार

“५ वर्षांत मुंब्र्यात फक्त MIM…”, जितेंद्र आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देणारी Sahar Shaikh कोण आहे?
2

“५ वर्षांत मुंब्र्यात फक्त MIM…”, जितेंद्र आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देणारी Sahar Shaikh कोण आहे?

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय
3

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप
4

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.