Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद! माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन

फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषद अंतर्गत उद्योजकता पुरस्कार २०२४ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कोकणातीलच पाच जणांना पुरस्कार देऊन सम्नानित करण्यात आलं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2024 | 09:50 AM
जिल्हा फेडरेशनचा पुरस्कार वितरण कार्यक्रमजिल्हा फेडरेशनचा पुरस्कार वितरण कार्यक्रम

जिल्हा फेडरेशनचा पुरस्कार वितरण कार्यक्रमजिल्हा फेडरेशनचा पुरस्कार वितरण कार्यक्रम

Follow Us
Follow Us:

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनातील सहकार सभागृहात फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषद अंतर्गत उद्योजकता पुरस्कार २०२४ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कोकणातीलच पाच जणांना पुरस्कार देऊन सम्नानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे व उद्योग मंत्री सुरेश प्रभू कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन या कार्यक्रमावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं.

फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषद अंतर्गत उद्योजकता पुरस्कार २०२४ या कार्यक्रमात गद्रे मरीन एक्सपोर्टचे दीपक गद्रे यांना जिल्हा फेडरेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांना सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने, स्कॉन प्रोजेक्टचे चेअरमन उद्योजक निलेश चव्हाण यांना जागतिक उद्योजकता पुरस्काराने, घरडा केमिकल्स कंपनी यांना रत्नागिरी जिल्हा उद्योजकता सामाजिक पुरस्काराने आणि डिलाईट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अनिल देवळे यांना जिल्हा उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माजी मंत्री केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात आलं.

या कार्यक्रमावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं की, कोकणी माणसाला विशेष म्हणजे मराठी माणसाला उद्योग करता येत नाही, असे म्हटले जाते. मात्र, फेडरेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात कोकणातीलच पाच जणांचा सन्मान होत आहे. या कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद आहे. जगाला काय हवे याचा शोध घेऊन उद्योग सुरू केल्यास तो कायम टिकतो. या पाच जणांनी जगाची गरज ओळखून उद्योग सुरू केल्याने ते जागतिक पातळीवरचे उद्योजक होऊ शकले आहेत. कोकणी माणूस मनात आणले तर काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण आणि आदर्श हे पाच जण आहेत. त्यामुळे असे कीर्तीवान उद्योजक घडले पाहिजेत.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू पुढे म्हणाले की,आपल्या देशात बऱ्याच बाबी उलट आहेत. आज १४ टक्के शेतकरी उत्पन्न घेतो आणि ६५ टक्के म्हणजे ८० कोटी लोकांना तो धान्य पुरवतो. त्यामुळे ही परिस्थिती बदलली पाहिजे म्हणजे उलटी झाली पाहिजे. जगाचा पोशिंद असलेल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवले पाहिजे. शेतकरी टिकला तरच सर्वांचे भले आहे, याचा विचार झाला पाहिजे असे सांगतानाच खऱ्या अर्थाने शेतकरी हा उद्योजक आहे. तो धोका पत्करून आपली शेती करीत असतो. यामुळे शेतकऱ्यांचा देखील वेळोवेळी सन्मान झाला पाहिजे. सामाजिक प्रश्नाला आपण मागे सारले आहेत. त्यामुळे त्यांचा डोंगर झाला असून ते सोडवण्याची गरज आहे.

यावेळी व्यासपीठावर पुरस्कार प्राप्त उद्योजकांसह, चिपळूण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, माजी आमदार डॉ विनय नातू, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, सचिव केशव भट, उपाध्यक्ष राजू सावंत, माजी आमदार रमेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सौ. उमा सुरेश प्रभू, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस.बी. पाटील, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक रवींद्र भोसले, सत्यवान मामुनकर , सोमा गुडेकर, रवींद्र भोसले, शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सचिन कदम, सुरेश साठे, विनंती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी सचिन खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Global success of konkani entrepreneurs is commendable assertion of former union minister suresh prabhu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 09:48 AM

Topics:  

  • Latest Marathi News
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
1

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
2

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
3

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.