
फोटो सौजन्य सोशल मीडिया
पाल जिल्हा परिषद गटातील चोरजवाडी, मरळी, धावरवाडी, मस्करवाडी, साखरवाडी, भगतवाडी आणि चोरे या गावांना भेट देत त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि जलस्रोतांची परिस्थिती जाणून घेत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या.
यंदा कराड तालुक्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर बाबुराव पवार यांनी गावोगावी जाऊन शेतांची पाहणी केली. बंधारे, पाझर तलाव आणि अन्य जलस्रोतांची स्थितीही त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. उपलब्ध पाणीसाठा आणि सिंचनाची परिस्थिती याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
पावसाची स्थिती, पिकांवर झालेला परिणाम, सिंचनासाठी उपलब्ध पाणी आणि आगामी हंगामातील पाण्याचा प्रश्न याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. पाण्याची कमतरता आणि पिकांची झालेली अवस्था यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुढील हंगामाबाबत चिंता व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती पाहिल्याशिवाय त्यांच्या अडचणींची तीव्रता समजून घेता येणार नाही, असे बाबुराव पवार यांनी सांगितले.
गावोगावी पाहणी करून समोर आलेली वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. कराड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे संघटक प्रमुख रामभाऊ घाडगे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, खजिनदार राजेंद्र साळुंखे, चंद्रकांत साळुंखे, एससी सेलचे अध्यक्ष विक्रम सावंत तसेच संबंधित गावांतील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेताची परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली आहे.
पावसाअभावी अनेक भागांत शेतीसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा द्यावा.”