Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेळ्या मेढ्या मृत्यू प्रकरण: जिवंत प्राण्यांना वस्तूसारखं का ठेवले?, उच्च न्यायालयाचे सीमा शुल्क विभागाला खडेबोल

२१ एप्रिल २०२३ रोजी रत्नागिरीतून बकरी ईदसाठी शेळ्यामेढ्यांची तस्करी करून त्यांना दुबईला नेणाऱ्या जहाजावर सीमा शुल्क विभागाने कारवाई केली. विभागाने स्थानिक दंडाधिकार्‍यांकडे शेळ्यामेढ्यांच्या लिलावाची परवानगी मागितली. मात्र, दंडाधिकार्‍यांनी परवानगी नाकारून ध्यान फाउंडेशनकडे शेळ्या-मेंढ्या देण्याचे आदेश दिले. या आदेशाविरुद्ध शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या अल-मदीना कंपनीने सत्र न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवला.

  • By Vivek Bhor
Updated On: May 20, 2023 | 08:11 PM
goat and sheep death case why treated live animals as commodities high court slams customs department nrvb

goat and sheep death case why treated live animals as commodities high court slams customs department nrvb

Follow Us
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : सीमाशुल्क विभागाने (Customs Department) जप्त (Seized) केलेल्या तीन हजार ३३२ शेळ्या-मेंढ्यांपैकी (Goats And Sheeps) एक हजार ३७९ शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूबद्दल (Death) उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली (High Court Expressed Displeasure). जेव्हा, प्राण्यांना पकडले जाते तेव्हा त्यांच्या देखभालीसाठी कोणती प्रक्रिया अंमलात आणली जाते?, सजीव प्राण्यांना नाशवंत वस्तूंच्या श्रेणीत कसे ठेवता येऊ शकते?, शेळ्यामेढ्या निर्जीव वस्तू आहेत का?, त्यांना शीतगृहात ठेवण्यात का आले?, अशी प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने यावेळी केली.

तस्करी करून परदेशात नेणाऱ्या मेळ्यामेंढ्यांना सीमा शुल्क विभागाने पकडले. मात्र, योग्य काळजी न घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करणारी याचिका ध्यान फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता प्राण्यांच्या हितासाठी उपाय शोधले आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे होणारे मृत्यू टाळता येतील, अशी टिपण्णी सुट्टीकालीन न्या. गौरी गोडसे यांनी केली.

[read_also content=”पीडितेशी लग्न केले म्हणून आरोपीला शिक्षेत दया नाही, सत्र न्यायालयाने ठोठावला सशर्त साडेतीन वर्ष सश्रम कारावास https://www.navarashtra.com/maharashtra/accused-got-no-mercy-in-punishment-for-marrying-victim-sessions-judge-sentenced-him-to-three-and-a-half-years-rigorous-imprisonment-nrvb-402058.html”]

काय आहे प्रकरण

२१ एप्रिल २०२३ रोजी रत्नागिरीतून बकरी ईदसाठी शेळ्यामेढ्यांची तस्करी करून त्यांना दुबईला नेणाऱ्या जहाजावर सीमा शुल्क विभागाने कारवाई केली. विभागाने स्थानिक दंडाधिकार्‍यांकडे शेळ्यामेढ्यांच्या लिलावाची परवानगी मागितली. मात्र, दंडाधिकार्‍यांनी परवानगी नाकारून ध्यान फाउंडेशनकडे शेळ्या-मेंढ्या देण्याचे आदेश दिले. या आदेशाविरुद्ध शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या अल-मदीना कंपनीने सत्र न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवला. विभागाने कायदेशीर प्रक्रियेनुसार करारनामा करून शेळ्या-मेंढ्या मालकाच्या ताब्यात दिल्या. दरम्यान, फाऊंडेशनने सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावेळी १० मेपर्यंत पकडलेल्या मेंढ्या आणि शेळ्यांपैकी १,३७९ मरण पावल्या होत्या. त्यांच्या मृत्यूचे कारण गुदमरणे आणि उपचारात निष्काळजीपणा असल्याचे समोर आले.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 20 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-20-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

फाउंडेशन आणि सीमा विभागाचा दावा

फाउंडेशनचे वकील जे.एस. किणी यांनी दावा केला की, सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून मेंढ्या आणि शेळ्यांची योग्य काळजी घेतली नाही. त्यांची वैद्यकीय तपासणी आणि कान टॅगिंगच्या दिशेने पावले उचलली नाहीत, फाऊंडेशन काळजी घेण्यास तयार असून जप्त करण्यात आलेल्या प्राण्यांबाबत प्रमाणित संचालन पद्धत (एसओपी) जारी केली. मात्र, सीमाशुल्क विभागाने त्याचे पालन केले नाही. पहिल्याच दिवशी ६० शेळ्या-मेंढ्या दगावल्या. विभागाने नियमांनुसार, मालकाच्या ताब्यात मेंढ्या दिल्या होत्या. संस्थेने शेळ्यामेंढ्यांच्या देखभालीबाबत कोणतेही पाऊले उचलली नाहीत. असे संगून सीमाशुल्क विभागाने फाऊंडेशनच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Web Title: Goat and sheep death case why treated live animals as commodities high court slams customs department nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2023 | 08:11 PM

Topics:  

  • customs department
  • High court

संबंधित बातम्या

मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी
1

मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी
2

धक्काबुक्कीमुळे पालिकेच्या अधिकारी महिलेचा गर्भपात; नवी मुंबईतील घटनेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.