Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Dudh Sangh Election: अदृश्य शक्तींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; ४९२ दूध संस्थांना मतदानाचा हक्क कायम

Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अवसायनातील दूध संस्थांच्या पात्रतेचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत होता. या संस्थांना मतदार यादीत स्थान देण्यास आक्षेप घेत न्यायालयीन लढाई सुरू करण्यात आली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 17, 2026 | 11:11 AM
Gokul Dudh Sangh, Kolhapur, Supreme Court,

Gokul Dudh Sangh, Kolhapur, Supreme Court,

Follow Us
Follow Us:
  • सर्वोच्च न्यायालयाने गोकुळच्या ४९२ अवसायनातील दूध संस्थांची अपात्रतेची याचिका फेटाळली
  • न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा व न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठाचा निर्णय
  • इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल झाली होती याचिका
Gokul Dudh Sangha Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, अवसायनातील दूध संस्थांना मतदार यादीतून अपात्र ठरवावे, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. अवसायनातील ४९२ दूध संस्थांना मतदार यादीतून वगळावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या संस्थांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग कायम राहणार असून गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अवसायनातील दूध संस्थांच्या पात्रतेचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत होता. या संस्थांना मतदार यादीत स्थान देण्यास आक्षेप घेत न्यायालयीन लढाई सुरू करण्यात आली होती. त्यामुळे गोकुळची निवडणूक प्रक्रिया पुढे जाणार की पुन्हा कायदेशीर अडचण निर्माण होणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने या वादावर महत्त्वाचा निर्णय झाला आहे. या निकालाकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. सहाय्यक

निबंधक (दुग्ध), कोल्हापूर यांनी अवसायनात काढलेल्या संस्थांपैकी १९४ दूध संस्था उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने पात्र ठरवल्या होत्या. तर अवसायनातील आणखी २९८ दूध संस्था जिल्हा उपनिबंधक, पुणे यांच्याकडे झालेल्या सुनावणीत पात्र ठरल्या होत्या.

१८ ऑक्टोबरला होणार मतदान

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १८ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. गोकुळच्या निवडणुकीला कोल्हापूरच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे. दूध संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी है निवडणुकीतील प्रमुख मतदार असल्याने पात्र संस्थांची संख्या आणि त्यांचा मतदानाचा अधिकार हा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा ठरतो.

Sudan Gold Mine : सुदानमध्ये भीषण अपघात; सोन्याची खाण कोसळून 67 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले

 

जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग

न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही काळ गोकुळच्या निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे आता संभाव्य उमेदवार, पॅनेल आणि मतदार संस्थांमधील संपर्क याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १८ ऑक्टोबरच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय गोकुळ निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा ठरला असून, पुढील काळात कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. एकूण ४९२ दूध संस्थांच्या पात्रतेला इस्युली येथील श्रीराम दूध संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ४९२ दूध संस्थांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. अभिषेक मनू संघवी यांनी बाजू मांडली. याचिका फेटाळल्याने पात्र ठरलेल्या ४९२ संस्थांचा गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

 

 

Web Title: Gokul dudh sangh election supreme court dismisses plea against 492 liquidated societies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Gokul Milk
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
1

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
2

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ
3

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ

Supreme Court Notice To UP Govt:माजी आमदारांना निवृत्तीवेतन कशासाठी? सर्वोच्च न्यायालयाची उत्तर प्रदेश सरकारला नोटीस!
4

Supreme Court Notice To UP Govt:माजी आमदारांना निवृत्तीवेतन कशासाठी? सर्वोच्च न्यायालयाची उत्तर प्रदेश सरकारला नोटीस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.