Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: लाच घेताना वनपाल अडकला जाळ्यात! एसीबीची पारसटोला येथे धडक कारवाई; दोन वनरक्षकांनाही घेतले ताब्यात

रेती उपसा व वाहतूक प्रकरणात कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना राजुली क्षेत्राचे वनपाल रमेश पचारे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही धडक कारवाई अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसटोला कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी दोन वनरक्षकांनाही ताब्यात घेण्यात आले असून तिघांविरुद्ध केसोरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 12, 2026 | 07:06 PM
Gondiya News: लाच घेताना वनपाल अडकला जाळ्यात! एसीबीची पारसटोला येथे धडक कारवाई; दोन वनरक्षकांनाही घेतले ताब्यात
Follow Us
Follow Us:
  • ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणारे वनपाल रमेश पचारे एसीबीच्या जाळ्यात अडकले.
  • अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसटोला कार्यालयात ही कारवाई करून दोन वनरक्षकांनाही एसीबीने ताब्यात घेतले.
  • तक्रारदाराच्या तक्रारीवरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून तिघांविरुद्ध केशोरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

रेती उपसा व वाहतूक प्रकरणात कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील परसटोला येथील वनविभागाच्या कार्यालयात करण्यात आली. यावेळी दोन वनरक्षकांनाही ताब्यात घेण्यात आले.

रमेश सखाराम पचारे (५७), वनपाल, राजुली सावनक्षेत्र, गोठणगाव वनपरिक्षेत्र, असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर नीलोत्पल हिरालाल शिकारे (३१) आणि चिंटू मंगलसिंग परिहार (३८), अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

Gondiya News: पुरामुळे तुटतोय ९६ गावांचा संपर्क! पावसाळ्यामध्ये वैनगंगा आणि बाग नदीला येतोय पूर

एसीबीने सापळा रचून केली कारवाई दोघेही वनरक्षक,

एसीबीकडे २४ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू असून, मार्च २०२६ मध्ये घरासाठी आवश्यक रेती गावाशेजारील नाल्यातून आणत असताना वनपाल पचारे यांनी त्यांचा ट्रॅक्टर अडविला. रेती उपसा व वाहतुकीप्रकरणी कारवाई करण्याची धमकी देत २५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ९ जुलै रोजी तक्रारदार रॉयल्टीची रेती घराजवळ उतरवून रिकामा ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जात असताना पचारे व वनरक्षक शिकारे यांनी ट्रॅक्टर अडवून चावी काढून घेतली. घराचे बांधकाम सुरू केल्यापासून एकही पडताळणीदरम्यान आरोपींकडून २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने सापळा रचला.

तक्रारदाराला २० हजार रुपयांची लाच रक्कम देऊन परसटोला कार्यालयात पाठविण्यात आले. पचारे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या वनरक्षक शिकारे व परिहार यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध केशोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

Gondiya News: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी! बिबिटोलातील घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी पचारे यांनी तक्रारदाराला ८ ऑगस्ट रोजी परसटोला राउंड ऑफिसमध्ये हजर राहण्याची नोटीस दिली. तक्रारदार तेथे हजर झाल्यानंतर पचारे व शिकारे यांनी प्रकरण ‘सेटलमेंट’ करण्याची तयारी दर्शवत २५ हजारांऐवजी २० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचे समोर आले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी गोंदिया एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

Web Title: Gondia acb trap forester and two forest guards detained for bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • gondiya
  • india
  • maharashtra

संबंधित बातम्या

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
1

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
2

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?
3

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.